BMC Election 2026: मुंबई पालिका निवडणुकांसाठी AIMIM सज्ज; 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पक्षाने आपली कंबर कसली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या सूचनेनुसार मुंबईतील 7 उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

BMC Election 2026: मुंबई पालिका निवडणुकांसाठी AIMIM सज्ज; 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

BMC Election 2026: आगामी 2026 च्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) पक्षाने आपली कंबर कसली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या सूचनेनुसार मुंबईतील 7 उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. 

मानखुर्द-शिवाजी नगरवर विशेष लक्ष

एमआयएमने जाहीर केलेली पहिली यादी प्रामुख्याने मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांवर केंद्रित आहे. यामध्ये महिला, ओबीसी आणि अनुसूचित जाती अशा सर्व स्तरांतील उमेदवारांना संधी देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. 

हेही वाचा – Sandeep Raut : संसदेत संजय, विधानसभेत सुनील अन् आता पालिकेत संदीप; संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत निवडणुकीच्या रिंगणात

सात उमेदवारांची नावे  

या यादीनुसार, प्रभाग क्रमांक 134 मधून मेहजबीन अतिक अहमद खान (महिला उमेदवार), प्रभाग 135 मधून खान इर्शाद असलम अली, प्रभाग 136 मधून मोहम्मद जमीर मोहम्मद मुर्तुझा कुरेशी, प्रभाग 137 मधून शमीर रमजान पटेल, प्रभाग 138 मधून रोशन इरफान शेख (ओबीसी प्रवर्ग), प्रभाग 139 मधून शबाना मोहम्मद आतिफ शेख (महिला उमेदवार) आणि प्रभाग 140 मधून विजय तातोबा उबाळे (अनुसूचित जाती – SC) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही एमआयएमने उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये अहमदनगर प्रभाग 4 मधून शहनाज खालिद शेख, सलमा जबीर शेख, शाहबाज अहमद सय्यद आणि समद वहाब खान, लातूर प्रभाग 4 मधून सुमय्या मोहम्मद अली शेख आणि परभणीतून आलिया अंजुम मोहम्मद गौस जैन यांच्या नावांचा समावेश आहे.

हेही वाचा – Pune Election 2026: कुख्यात गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात, सत्ताधारी पक्षाकडून तिकीट; नव्या वादाला ठिणगी

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार बीएमसी निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. नामांकन प्रक्रिया 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत चालेल, तर 31 डिसेंबर 2025 रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 पर्यंत असून 3 जानेवारी 2026 रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल. अखेर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार असून 16 जानेवारी 2026 रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या पहिल्या यादीमुळे एमआयएमने मुंबई महापालिकेत आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number