Devendra Fadnavis: ‘AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, पण…’; नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

येत्या काळात हे विद्यापीठ देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थांच्या यादीत अग्रस्थानी दिसेल, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. <br/>

Devendra Fadnavis: ‘AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, पण…’; नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

Devendra Fadnavis: नागपूर येथील नामांकित 'श्री रामदेवबाबा विद्यापीठात' अत्याधुनिक AI लॅब आणि सुपर कॉम्प्युटर यंत्रणेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. बनवारीलाल पुरोहित यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेल्या या संस्थेने केवळ विदर्भातच नव्हे, तर देशभरात एक उत्कृष्ट खाजगी शैक्षणिक संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. येत्या काळात हे विद्यापीठ देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थांच्या यादीत अग्रस्थानी दिसेल, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

तंत्रज्ञानामुळे 70 टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार
नवीन युगातील तंत्रज्ञानावर भाष्य करताना सांगण्यात आले की, रोबोटिक्स आणि जैवतंत्रज्ञानाप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) मानवी जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवत आहे. येणाऱ्या काळात AI मुळे रोजगार पूर्णपणे संपुष्टात येणार नसले, तरी काम करण्याच्या पद्धतीत आणि नोकऱ्यांच्या स्वरूपात किमान 70 टक्के मोठे बदल घडणार आहेत. त्यामुळेच आजच्या आधुनिक शिक्षणसंस्थांनी संशोधनावर भर देऊन काळासोबत बदलणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर, रामदेवबाबा विद्यापीठाची नवी AI लॅब कुशल मनुष्यबळ घडवण्यात मैलाचा दगड ठरेल, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा –  Nana Patole Viral Video : "त्यांनी सांगितलं पाहिजे मी राजकारण सोडलं" नाना पटोलेंचा दूधाने पाय धुण्याचा व्हिडिओ व्हायरल; भाजप नेत्याचेी खळबळजनक प्रतिक्रिया

'महाविस्तार' ॲप आणि नव्या शैक्षणिक धोरणाचा प्रभाव
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा थेट उपयोग सांगताना स्वित्झर्लंडच्या प्रगत आरोग्य व्यवस्थेचा आणि महाराष्ट्रातील 'महाविस्तार' ॲपचा विशेष उल्लेख केला. या ॲपच्या माध्यमातून राज्यातील बळीराजा केवळ पिकाचा 1 फोटो काढून आपल्या स्थानिक बोलीभाषेत AI द्वारे अचूक कृषी सल्ला मिळवू शकतो. याशिवाय, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) केवळ पदवीधर तरुण तयार न करता, बाजारातील थेट गरजेनुसार रोजगारक्षम पिढी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. उद्योगजगतातील बदलांनुसार अभ्यासक्रम विकसित करणाऱ्या संस्थाच भविष्यात टिकून राहतील, असा संदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number