Aaditya Thackeray Letter To PM: इंधनातील इथेनॉल मिश्रणावर आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधानांना पत्र; केला ‘हा’ मोठा दावा

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी नमूद केले की, भारतात मध्यमवर्गीय नागरिक अनेक वर्षांची बचत करून किंवा कर्ज (EMI) काढून दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करतात.

Aaditya Thackeray Letter To PM: इंधनातील इथेनॉल मिश्रणावर आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधानांना पत्र; केला ‘हा’ मोठा दावा

Aaditya Thackeray Letter To PM: पेट्रोलमधील इथेनॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे वाहनांची कार्यक्षमता आणि मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी देशभरातून समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारच्या अनिवार्य इथेनॉल मिश्रण धोरणामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, याचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा दावा त्यांनी या पत्रात केला आहे.

इथेनॉलमुळे मायलेज घटले; ग्राहकांवर सक्ती नको

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी नमूद केले की, भारतात मध्यमवर्गीय नागरिक अनेक वर्षांची बचत करून किंवा कर्ज (EMI) काढून दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करतात. परंतु, सध्या पेट्रोलमध्ये वाढवण्यात आलेल्या इथेनॉलच्या मिश्रणामुळे वाहनांचे मायलेज कमालीचे घटले असून इंजिनच्या कामगिरीवरही विपरीत परिणाम होत आहे. सध्या रस्त्यावर धावणारी लाखो वाहने ही उच्च क्षमतेच्या इथेनॉल मिश्रित इंधनासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत. कोणताही पर्याय उपलब्ध न ठेवता ही सक्ती ग्राहकांवर लादली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

केवळ विशिष्ट उद्योगांचा फायदा? पाणीटंचाईचाही गंभीर प्रश्न

इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऊस हे अत्यंत जास्त पाणी लागणारे पीक असून, देशातील अनेक भाग तीव्र पाणीटंचाईचा सामना करत असताना हा पर्याय कितपत शाश्वत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या धोरणाचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला मिळण्याऐवजी केवळ काही ठराविक कंपन्या आणि औद्योगिक समूहांचे खिसे भरण्यासाठी होत असल्याची शंका जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा – Maharashtra Politcs : ‘आगामी काळात ठाकरे-शिंदे एकत्र येतील, तर 15 दिवसांत राष्ट्रवादी…’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल; दोन्ही पर्याय देण्याची मागणी

दरम्यान, जागतिक पातळीवरील उदाहरणे देत आदित्य ठाकरेंनी भारतातही इंधन निवडीचे स्वातंत्र्य देण्याची आग्रही मागणी केली आहे. ज्या वाहनांची रचना इथेनॉलसाठी पूरक आहे त्यांना ते इंधन वापरू द्यावे, तर इतरांसाठी 100 टक्के शुद्ध पेट्रोलचा पर्याय बाजारात उपलब्ध ठेवावा. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इंधन निवडण्याची मुभा दिल्यास लाखो वाहनधारकांची गैरसोय टळेल आणि शासकीय धोरणांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number