Adhik Maas 2026 : अधिक मासाचे शास्त्र आणि धार्मिक महत्त्व काय आहे? या महिन्याला ‘धोंड्याचा महिना’ का म्हणतात? जाणून घ्या

हा महिना केवळ ईश्वराची भक्ती, उपासना आणि आत्मिक शुद्धीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कोणतीही विशेष कार्ये किंवा शुभकार्ये या महिन्यात केली जात नाहीत.

Adhik Maas 2026 : अधिक मासाचे शास्त्र आणि धार्मिक महत्त्व काय आहे?  या महिन्याला ‘धोंड्याचा महिना’ का म्हणतात? जाणून घ्या

Adhik Maas 2026 Significance : भारतीय पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणाऱ्या वाढीव महिन्याला 'अधिकमास' असे म्हटले जाते. खगोलीय दृष्टिकोनातून पाहिले तर, सौर वर्ष हे 365 दिवसांचे असते, तर चांद्र वर्ष 354 दिवसांचे असते. या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी 3 वर्षांनंतर जो 33 दिवसांचा काळ अतिरिक्त ठरतो, त्यालाच 'अधिकमास' म्हणून गणले जाते. यामुळे त्या विशिष्ट वर्षात 12 ऐवजी 13 महिने येतात, ज्यामुळे ऋतुचक्र आणि तिथींचा मेळ बसवला जातो.

'धोंड्याचा महिना' हे नाव पडण्यामागचे कारण
प्राचीन काळी हा महिना सौर आणि चांद्र वर्षातील फरकामुळे आलेला अतिरिक्त काळ मानला जात असे. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल विधी करण्याची शास्त्रोक्त पद्धत नव्हती. हा महिना 'निरुपयोगी' मानला गेल्यामुळे त्याला दगड किंवा धोंड्याची उपमा दिली गेली. ज्याप्रमाणे दगड हा कोणत्याही महत्त्वाच्या कामात वापरला जात नाही (शुभ कार्यासाठी), त्याचप्रमाणे या महिन्याला पूर्वी 'धोंडा' किंवा दगडाचे नाव पडले.

हेही वाचा – Ashtavinayak Temples News : अष्टविनायक भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे महिनाभर बंद; हे आहे कारण

धोंड्याचा महिना ते 'पुरुषोत्तम मास' असा झाला बदल
हा अतिरिक्त महिना असल्याने आणि यात शुभकार्य वर्ज्य असल्याने, पूर्वी या महिन्याचा तिरस्कार केला जात असे. अशी मान्यता आहे की, या महिन्याचे दुःख पाहून भगवान विष्णूंनी त्याचे दायित्व स्वतःकडे घेतले. त्यांनी या महिन्याला आपले 'पुरुषोत्तम' हे नाव दिले, ज्यामुळे हा काळ अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. भगवान विष्णूंच्या या वरदानामुळे या महिन्यात पूजा, अर्चा, नामस्मरण आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते, अशी श्रद्धा आहे.

या महिन्यात शुभकार्ये का केली जात नाहीत?
धार्मिक शास्त्रांनुसार अधिकमासाला 'मलमास' असेही म्हणतात. हा महिना केवळ ईश्वराची भक्ती, उपासना आणि आत्मिक शुद्धीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी ऐहिक सुखांशी संबंधित कामे या काळात वर्ज्य मानली जातात. यामागील मूळ उद्देश हा आहे की, माणसाने ऐहिक व्यापांतून थोडा वेळ बाजूला काढून आपली साधना पूर्ण करावी. या महिन्यात 'धोंडे' (गुळाचे गोड पदार्थ) देण्याची प्रथा असून मुलगी आणि जावयाला लक्ष्मी-नारायणाचे स्वरूप मानून वाण दिले जाते.

हेही वाचा – Adhik Maas 2026: यंदा अधिक मास! आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी; जाणून घ्या दानधर्म, मुहूर्त आणि महत्त्व 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number