गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेत लाच प्रकरणात मिळाली क्लीन चिट

कंपनीने सोमवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, स्वतंत्र पुनरावलोकनात त्यांच्याविरुद्ध कोणतीही अनियमितता आढळली नाही. अदानी ग्रुपने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेत लाच प्रकरणात मिळाली क्लीन चिट
Edited Image

मुंबई: अमेरिकेत सुरू असलेल्या लाचखोरी प्रकरणात आघाडीचे उद्योगपती अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीला मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीने सोमवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, स्वतंत्र पुनरावलोकनात त्यांच्याविरुद्ध कोणतीही अनियमितता आढळली नाही. अदानी ग्रुपने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण? 

नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अदानी ग्रीनचे व्यवस्थापकीय संचालक विनीत एस. जैन यांना अटक केली. भारतीय वीज प्रकल्पाचा करार मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. निधी उभारताना अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. या आरोपांअंतर्गत, अदानी ग्रुपवर 236 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कंपनीने जानेवारी 2025 मध्ये चौकशीसाठी एका स्वतंत्र कायदा फर्मची नियुक्ती केली.

हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचा गौतम अदानींना मोठा दिलासा! 388 कोटी रुपयांच्या बाजार नियमन उल्लंघन प्रकरणात निर्दोष मुक्तता

कंपनीकडून कायद्याचे उल्लंघन नाही – 

दरम्यान, कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, या स्वतंत्र चौकशीनंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की अदानी ग्रीन किंवा त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी कोणत्याही नियमांचे किंवा कायद्यांचे उल्लंघन केलेले नाही. कंपनीने असेही स्पष्ट केले की, ती भविष्यातही सर्व नियम आणि कायदे पाळत राहील. अदानी समूहाला आशा आहे की या आरोपांचा त्यांच्या व्यवसाय प्रतिमेवर आणि कामकाजावर दीर्घकालीन परिणाम होणार नाही. 

हेही वाचा – उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

फेब्रुवारी 2025 मध्ये, अमेरिकन बाजार नियामक संस्थेने भारतातील अधिकाऱ्यांकडून तपासात सहकार्य मागितले होते, जेणेकरून या प्रकरणाशी संबंधित तपशीलवार माहिती गोळा करता येईल. तथापि, अदानी ग्रीनने त्यांचे व्यवस्थापकीय संचालक विनीत एस. जैन यांचा कार्यकाळ वाढला होता. कंपनीने 10 जुलै 2025 पासून त्यांची पुन्हा पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number