Kerala New CM: काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळणार? मुख्यमंत्रीपदासाठी ‘हे’ 3 दिग्गज शर्यतीत

केरळचा नवीन मुख्यमंत्री आणि पक्षाचा चेहरा कोण असावा, यावर चर्चा करण्यासाठी नेमलेल्या काँग्रेस निरीक्षकांनी शुक्रवारी आपला सविस्तर अहवाल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला.

Kerala New CM: काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळणार? मुख्यमंत्रीपदासाठी ‘हे’ 3 दिग्गज शर्यतीत

Kerala New CM: केरळमधील काँग्रेस नेतृत्वाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यातील नवीन मुख्यमंत्री आणि पक्षाचा चेहरा कोण असावा, यावर चर्चा करण्यासाठी नेमलेल्या काँग्रेस निरीक्षकांनी शुक्रवारी आपला सविस्तर अहवाल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालासाठी निरीक्षकांनी केरळमधील सर्व काँग्रेस आमदारांशी वैयक्तिक आणि सामूहिक रित्या संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत. या अहवालातील निष्कर्षांवरून आता केरळच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.

के.सी. वेणुगोपाल शर्यतीत आघाडीवर; 40 हून अधिक आमदारांचा कौल
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत के.सी. वेणुगोपाल यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. 40 ते 43 आमदारांनी वेणुगोपाल यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवल्याचे समजते. मात्र, त्यांचे मुख्यमंत्री होणे हे सर्वस्व दिल्लीतील हायकमांडच्या निर्णयावर अवलंबून आहे. वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे राहुल गांधी त्यांना राज्याच्या राजकारणात पाठवण्यास तयार होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. हाच कळीचा मुद्दा वेणुगोपाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गातील निर्णायक वळण ठरू शकतो.

हेही वाचा – Tamil Nadu Election 2026: 'आधी 118 आमदारांची पत्रं आणा, मगच शपथविधी'; तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांचा विजय यांना सज्जड दम; घोडेबाजाराच्या भीतीने निर्णय लांबणीवर?

रमेश चेन्निथला आणि व्ही.डी. सतीशन यांच्या नावांचीही चर्चा
वेणुगोपाल यांच्या नावावर एकमत न झाल्यास, काँग्रेसकडे रमेश चेन्निथला आणि व्ही.डी. सतीशन हे दोन प्रबळ पर्याय उपलब्ध आहेत. रमेश चेन्निथला यांना 20 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असून त्यांच्याकडे दांडगा प्रशासकीय अनुभव आहे. दुसरीकडे, व्ही.डी. सतीशन यांचे नावही चर्चेत आहे. सतीशन यांना केवळ काँग्रेस आमदारांचाच नव्हे, तर 'यूडीएफ' (UDF) मधील आययुएमएल (IUML) आणि केरळ काँग्रेस (जोसेफ गट) यांसारख्या मित्रपक्षांचाही मोठा पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि तळागाळातील पकड यामुळे मित्रपक्षांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली असून, विद्यमान आमदारालाच मुख्यमंत्रीपद मिळावे, असा त्यांचा आग्रह आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number