NCP Internal Clash : वादग्रस्त वक्तव्य भोवलं!; अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांना प्रवक्तापदावरून हटवलं, नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर

वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांना अखेर पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटविण्यात आले आहे.

NCP Internal Clash : वादग्रस्त वक्तव्य भोवलं!; अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांना प्रवक्तापदावरून हटवलं, नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर

NCP Internal Clash: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Ajit Pawar) पुन्हा एकदा शिस्तभंगाचे पडसाद उमटले आहेत. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांना अखेर पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटविण्यात आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दोघांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता, तसेच पक्षाचीही कोंडी होत असल्याची चर्चा होती.

दरम्यान, फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून रुपाली ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. यामुळे ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. त्यांनी यानंतर अजित पवारांची भेट घेतली असली तरी काही तासांतच त्यांच्यावर कारवाई झाली. पक्षाने त्यांना प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करत निर्णय स्पष्ट केला आहे.

हेही वाचा – BMC Election : मोठी घोषणा!; मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, मविआ-मनसे समीकरण बनलं गुंतागुंतीचं

यासोबतच वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांनाही प्रवक्तेपदावरून हटविण्यात आले आहे. तर काही काळापूर्वी संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांवरील हल्ल्यामुळे बाजूला झालेल्या सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयावर मिटकरी आणि ठोंबरे यांची काय प्रतिक्रिया असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?

फलटण येथील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येवरून पक्षातील दोन महिला नेत्यांमध्ये थेट संघर्ष उफाळला होता. रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर “तरुणीचं चारित्र्यहनन केलं” असा गंभीर आरोप केला होता. पक्षाने या वादाची दखल घेत ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यात 7 दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागविण्यात आले होते. मात्र समाधानकारक उत्तर न दिल्याने पक्षाने ठोंबरे यांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे-मनसे युती शक्य? आरक्षण सोडतीनंतर होणार सगळंच चित्र स्पष्ट

नव्या प्रवक्त्यांची यादी  

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनिल पाटील, रुपाली चाकणकर, ब्रिजमोहन श्रीवास्तव, चेतन तुपे, आनंद परांजपे, अविनाश आदिक, सना मलिक, राजलक्ष्मी भोसले, सुरज चव्हाण, हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर, राजीव साबळे, प्रशांत पवार, श्याम सनेर, सायली दळवी आणि शशिकांत तरंगे या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात शिस्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पक्षाने स्पष्ट संदेश दिला आहे की, शिस्तभंग करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड होणार नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number