Yugendra Pawar: ‘VSR कंपनीच्या मालकावर आणि कंपनीच्या संचालकांवर कारवाई झाली पाहिजे…’; युगेंद्र पवार यांची मागणी

युगेंद्र पवार यांनी अपघाताच्या प्राथमिक अहवालातील विसंगतींवर बोट ठेवत थेट सवाल उपस्थित केले आहेत.

Yugendra Pawar: ‘VSR कंपनीच्या मालकावर आणि कंपनीच्या संचालकांवर कारवाई झाली पाहिजे…’; युगेंद्र पवार यांची मागणी

Yugendra Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेले संशयाचे धुके आता अधिक गडद होत आहे. या प्रकरणाच्या तपासातील त्रुटी आणि विसंगतींवर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज बारामतीमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित केले. ‘DGCA’ (नागरी विमान वाहतूक संचालनालय) आणि ‘AAIB’ च्या अहवालातील तांत्रिक माहितीवर त्यांनी शंका व्यक्त केली असून, या अपघातामागे काहीतरी लपवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तपासातील त्रुटींवर बोट: ‘DGCA चा रिपोर्ट संशयास्पद’
युगेंद्र पवार यांनी अपघाताच्या प्राथमिक अहवालातील विसंगतींवर बोट ठेवत थेट सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, “ज्या ठिकाणी विमान कोसळले, तो भाग दुष्काळी असून तिथे एकही मोठे झाड नाही. केवळ छोटी झुडपे असलेल्या जागी विमान कोसळले असताना, अहवालात मोठ्या झाडाचा उल्लेख कसा आला?” असा सवाल त्यांनी विचारला. केवळ संबंधित ‘लियर जेट’ (Learjet) नव्हे, तर त्या कंपनीची सर्व विमाने तात्काळ ग्राऊंड करण्यात यावीत. तसेच विमानाच्या मालक आणि संचालकांची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी आहे. दरम्यान, सीआयडी (CID) तपासाला एक महिना उलटूनही अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

पवार साहेब आणि पार्थ पवारांची राज्यसभा उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी रणनीतीबद्दल बोलताना युगेंद्र पवारांनी महाविकास आघाडीचे आभार मानले. राज्यसभेसाठी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले, “देशाला आज शरद पवार यांच्या 60 वर्षांच्या दांडग्या राजकीय अनुभवाची नितांत गरज आहे. तसेच, पार्थ पवार यांना संधी देऊन पक्षाने तरुण नेतृत्वावर जो विश्वास दाखवला आहे, तो स्वागतार्ह आहे.” पवार कुटुंबातील दोन पिढ्या आता संसदेत राज्याचे नेतृत्व करताना दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – BJP Working Committee List : एकीकडे राज्यसभा निवडणुकीची लगबग, दुसरीकडे भाजपाची कार्यकारिणी जाहीर, उज्ज्वल निकमांच्या मुलाकडे महत्त्वाचं पद

“दादांसारखा दूरदृष्टीचा नेता हरपला”; बारामतीसमोर पाण्याचे आव्हान
अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना युगेंद्र पवार भावूक झाले. बारामती तालुक्यातील जिराईत भागातील पाणी प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी आगामी संकटाची जाणीव करून दिली. मार्च महिना सुरू झाल्याने तालुक्यातील 32 गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू शकते. अशा वेळी अजित दादांची उणीव प्रकर्षाने भासत आहे. “दादांना तालुक्याची खडान् खडा माहिती होती. पालकमंत्री म्हणून त्यांनी बारामतीला हक्काचे पाणी मिळवून दिले. आता तसा दूरदृष्टीचा नेता आपल्यात नाही, त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी नागरिकांना स्वतः लढा द्यावा लागेल,” असे आवाहन त्यांनी केले. तथापी, आगामी काळात ‘जनाई शिरसाई’ आणि ‘पुरंदर उपसा’ सिंचन योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number