Abhishek Sharma World Record: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! 1000 धावांचा टप्पा गाठत बनला जगातील सर्वात जलद फलंदाज

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अभिषेकने आपल्या डावातील 11वी धाव घेताच 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.<br/>

Abhishek Sharma World Record: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! 1000 धावांचा टप्पा गाठत बनला जगातील सर्वात जलद फलंदाज

Abhishek Sharma World Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा तरुण डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने नवा इतिहास रचला आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अभिषेकने आपल्या डावातील 11वी धाव घेताच 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

 फक्त 528 चेंडूंत 1000 धावा

अभिषेक शर्माने केवळ 528 चेंडूंत 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करत इतिहास घडवला. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडच्या नावावर होता, ज्याने 569 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता. अभिषेकने त्याच्यावर मात करत सर्वात वेगाने 1000 धावा करणारा खेळाडू बनला आहे. या यादीत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर असून त्याने 573 चेंडूंमध्ये हा आकडा पार केला होता, तर इंग्लंडच्या फिल साल्टने 599 चेंडूंमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला होता.

हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या बायकोने केली अधिक पोटगीची मागणी, न्यायालयाने फटकारलं, म्हणाले, 'चार लाख कमी आहेत…?'

सर्वात कमी चेंडूंमध्ये 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा

अभिषेक शर्मा (भारत) – 528 चेंडू
टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया) – 569 चेंडू
सूर्यकुमार यादव (भारत) – 573 चेंडू
फिल साल्ट (इंग्लंड) – 599 चेंडू

विराट कोहलीनंतर दुसरा सर्वात जलद भारतीय

डावांच्या बाबतीत पाहता, अभिषेक शर्मा हा विराट कोहलीनंतर दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीने 27 डावांमध्ये 1000 धावा केल्या होत्या, तर अभिषेकने फक्त 28 डावांमध्ये हा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा – Sanju Samson In IPL 2026 : संजू सॅमसनवर अनेक फ्रँचायझींची नजर; CSK व्यतिरिक्त इतर संघांमध्येही खेळताना दिसू शकतो

सातत्यपूर्ण कामगिरीने संघाला दिला विश्वास

2025 मध्ये आतापर्यंत अभिषेक शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, सलामीवीर म्हणून त्याने भारताला अनेक सामन्यांमध्ये जलद आणि दमदार सुरुवात दिली आहे. त्याच्या अचूक टाइमिंग आणि आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय संघाच्या टी-20 रणनीतीला नवीन धार मिळाली आहे. अभिषेकच्या या कामगिरीनंतर क्रिकेट विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, भारतीय क्रिकेटचा पुढचा “टी-20 स्टार” म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number