Abhijit Dipke: अभिजीत दीपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांना पाठवली खास भेटवस्तू; म्हणाले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, कृपया…’

CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या आंदोलनादरम्यान थेट देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.

Abhijit Dipke: अभिजीत दीपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांना पाठवली खास भेटवस्तू; म्हणाले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, कृपया…’

Abhijit Dipke: देशातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) आंदोलन दिल्लीतील जंतरमंतर येथे सलग 6 व्या दिवशीही अत्यंत तीव्रतेने सुरूच राहिले. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या आंदोलनादरम्यान थेट देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या संदर्भात दीपके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते एका व्हाईटबोर्डवर शिक्षणमंत्र्यांना उद्देशून, “धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. कृपया राजीनामा द्या,” असा संदेश लिहिताना दिसत आहेत. या आंदोलनादरम्यान त्यांच्या समर्थकांनीही उपस्थित राहून त्यांच्या या मागणीला जाहीर पाठिंबा दिला.

‘X’ वर व्हिडिओ पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागितला राजीनामा
अभिजीत दीपके यांनी या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केला आहे. व्हाईटबोर्डवर आपला संदेश लिहिल्यानंतर CJP च्या संस्थापकाने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटले की, “धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कृपया आता तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला वाढदिवसाची विशेष भेट म्हणून थेट एक राजीनामा पत्रच पाठवत आहोत; तुम्हाला फक्त त्यावर तुमच्या अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे.” केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा वाढदिवस 26 जून रोजी असतो, आणि याच दिवसाचे औचित्य साधून आंदोलकांनी ही अनोखी मागणी लावून धरली.

हेही वाचा – Ebola outbreak 2026 : मोठा निर्णय! भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा 2.0’ बंधनकारक, काय आहे हा नियम?

NEET गैरव्यवहारावरून जंतरमंतरवर 6 दिवसांपासून आंदोलन; शिक्षण व्यवस्थेत सुधारणांची मागणी
NEET पेपरफुटी आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या विरोधात अभिजीत दीपके हे दिल्लीच्या जंतरमंतरवर तळ ठोकून आहेत. देशातील सध्याची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे सुधारली पाहिजे, अशी आग्रही मागणी करत त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ पद सोडावे, अशी भूमिका घेतली आहे. हे आंदोलन गेल्या 6 दिवसांपासून अविरतपणे सुरू असून, जोपर्यंत शिक्षणमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.

गोपनीयतेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा बळी 
दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनाच्या 5 व्या दिवशी, अभिजीत दीपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अधिकृत सोशल मीडिया खाते अचानक बंद केल्याबद्दल थेट केंद्र सरकारला धारेवर धरले. तसेच, जबाबदार अधिकाऱ्यांनी या कारवाईचे नेमके कारण सांगण्यास स्पष्ट नकार दिल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दीपके म्हणाले, ‘जर शासकीय पातळीवर प्रत्येक गोष्टीला ‘गोपनीय’ म्हटले जात आहे, तर मग लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारा NEET चा पेपर सरकारला गोपनीय का ठेवता आला नाही?’ पेपर फुटला नसता, तर अनेक नैराश्यात गेलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले नसते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही आणि आमचे पालक देशाचे प्रामाणिक करदाते आहोत, तरीही आम्हाला अशा न्याय्य हक्कांच्या आंदोलनासाठी दहशतवादी म्हटले जात आहे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number