Abhijeet Dipke on BJP: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांचा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप

'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजप आणि केंद्र सरकारवर सनसनाटी आरोप केले आहेत.

Abhijeet Dipke on BJP: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांचा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप

Abhijeet Dipke on BJP: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजप आणि केंद्र सरकारवर सनसनाटी आरोप केले आहेत. आंदोलन मागे घेण्यासाठी आणि पक्ष प्रवेशासाठी आपल्यावर सातत्याने मोठा राजकीय दबाव टाकला गेल्याचा दावा त्यांनी केला. ‘भाजपमध्ये सहभागी हो, अन्यथा तुला गोळ्या मारू’ अशा थेट धमक्या मिळाल्याचे सांगत दीपके यांनी आपल्या आई-वडिलांनाही धमकावले गेल्याचा खळबळजनक खुलासा केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) अनेक ऑफर्स आल्या तरीही आपण त्यांच्या पक्षाचा भाग होणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.  

मोदी-शाहांच्या वयावर बोट ठेवत 30 वर्षांच्या तरुणाला धमकावण्यावर सवाल  
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल करताना अभिजित दीपके यांनी त्यांच्या वयाचा आणि नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला. आपण अवघ्या 30 वर्षांचे असून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या नातवाच्या वयाचे आहोत, असे सांगत एका तरुण आंदोलनकर्त्याला धमकावताना देशाच्या वरिष्ठ नेत्यांना लाज वाटली पाहिजे, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या अशा दडपशाहीला आपण घाबरणार नसून तरुण पिढी देशाच्या हितासाठी संघर्ष करत राहील, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – Vijay Chaudhary Resignation: नंदुरबारमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पेटला; ‘त्या’ ऑडिओ क्लिपच्या वादानंतर भाजप नेते विजय चौधरींचा तडकाफडकी राजीनामा

संविधानापेक्षा व्यक्तीला मोठं केल्याने शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर  
देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना दीपके यांनी सांगितले की, 2014 नंतर देशात एकाच व्यक्तीला संविधान आणि राष्ट्रापेक्षा मोठे स्थान देण्यात आले. त्यामुळेच आज शिक्षण व्यवस्था, ढासळलेली आरोग्य यंत्रणा आणि महागाई यांसारख्या महत्त्वाच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. दिवसभर प्रसारमाध्यमे केवळ पंतप्रधान मोदींचा जप करत असल्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीवर चर्चाच होत नाही, अशी टीका त्यांनी केली. एका व्यक्तीचा उदोउदो करण्याऐवजी देशातील प्रत्येक नागरिकाने संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.  

भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया
अभिजित दीपके यांच्या या बोलण्यावर भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना तिखट प्रतिक्रिया दिली. ‘सध्याच्या काळात कोणाला मोठं व्हायचं असेल तर त्यांना भाजपचं नाव घेऊन बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अभिजित दीपके यांनी आभासी पक्षाऐवजी सक्रिय राजकारणात येऊन भाजपशी दोन हात करावेत,’ असं ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number