Aadhar-Pan Card Link: पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जवळ, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

1 जानेवारीपासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल. यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ही दोन्ही कागदपत्रे एकमेकांशी लिंक करणे गरजेचे आहे.

Aadhar-Pan Card Link: पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जवळ,  संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

भारतातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे पॅनकार्ड आणि आधार कार्ड आहे. ही दोन्ही अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुमची चिंता वाढू शकते. केंद्र सरकारने म्हटले आहे की, 31 डिसेंबर 2025 पर्यंत दोन्ही कागदपत्रे एकमेकांना लिंक केली नाहीत तर 1 जानेवारीपासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल. यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ही दोन्ही कागदपत्रे एकमेकांशी लिंक करणे गरजेचे आहे.

जर तुमचा पॅन आणि आधार लिंक नसेल, तर सामान्य करदात्यांना अनेक दैनंदिन आर्थिक कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. तुम्ही तुमचा आयकर रिटर्न (ITR) भरू शकणार नाही.  वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज किंवा कमी व्याजदराचे कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते. जर तुमचा पॅन निष्क्रिय असेल तर उच्च टीडीएस दर देखील लागू होऊ शकतात. 

जर करदात्याने देय तारखेपर्यंत पॅन-आधार लिंक केला नाही, तर पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी १,००० रूपयांचा दंड भरावा लागेल. पेमेंट इन्कम टॅक्स ई-पे टॅक्स सुविधेद्वारे करावे लागेल, त्यानंतर लिंकिंग पूर्ण होईल. जर लिंकिंग प्रक्रियेला पूर्वी उशीर झाला असेल, तर ₹१,००० चे विलंब शुल्क लागू होऊ शकते.

अनेक प्रकरणांमध्ये, नाव, जन्मतारीख किंवा मोबाईल क्रमांकातील फरकांमुळे पॅन-आधार लिंकिंग शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, प्रथम तपशील दुरुस्त करणे महत्वाचे आहे.

तुमचे पॅन तपशील अपडेट करण्यासाठी, ते प्रोटीन किंवा UTIITSL वेबसाइटद्वारे अपडेट करा.
तुमचे आधार तपशील अपडेट करण्यासाठी, ते UIDAI वेबसाइटद्वारे अपडेट करा किंवा UIDAI हेल्पडेस्कला ईमेल करा.

पॅन-आधार ऑनलाइन लिंक करण्याचा सोपा मार्ग

इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जा आणि 'लिंक आधार' पर्याय निवडा.

तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करा.

तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेल्या OTP चा वापर करून तपशील पडताळून पहा.

अंतिम मुदतीनंतर लिंक करत असल्यास, प्रथम ई-पे टॅक्सद्वारे १,००० रूये भरा, नंतर तपशील पुन्हा सबमिट करा.

तुमच्या पॅन-आधार लिंकिंगची स्थिती तपासणे खूप सोपे आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला आयकर पोर्टलला भेट द्यावी लागेल आणि पॅन-आधार लिंकिंगशी संबंधित पर्याय निवडावा लागेल.

पोर्टलवर तुमची माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुम्ही तुमचा आधार तुमच्या पॅनशी आधीच लिंक केलेला आहे का, तुमची लिंकिंग विनंती प्रलंबित आहे का किंवा तुमचा आधार अद्याप तुमच्या पॅनशी लिंक केलेला नाही का ते लगेच तपासू शकता.

यामुळे तुम्हाला तुमच्या परिस्थितीची आणि पुढील कारवाईची आवश्यकता आहे का याची स्पष्ट कल्पना येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number