Akola Mayor Election Twist : अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी ‘महाखिचडी’ पॅटर्न? प्रकाश आंबेडकर किंगमेकरच्या भूमिकेत; बंद दाराआड खलबतं

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि एमआयएमने आता 'वंचित'चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची मदत मागितली आहे.

Akola Mayor Election Twist : अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी ‘महाखिचडी’ पॅटर्न? प्रकाश आंबेडकर किंगमेकरच्या भूमिकेत; बंद दाराआड खलबतं

Akola Mayor Election Twist : अकोला महानगरपालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला बहुमताच्या आकड्याने हुलकावणी दिली आहे. याच संधीचा फायदा घेत, भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि एमआयएमने आता 'वंचित'चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची मदत मागितली आहे. अकोल्यात निर्माण झालेल्या या 'हाय व्होल्टेज' राजकीय पेचामुळे महापौर कुणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंबेडकरांच्या निवासस्थानी 45 मिनिटे खलबतं

भाजपकडे 38 जागा असून त्यांना बहुमतासाठी (41) अवघ्या 3 जागांची गरज आहे. ही जुळवाजुळव रोखण्यासाठी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. 'यशवंत भवन' या आंबेडकरांच्या निवासस्थानी झालेली ही 45 मिनिटांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला शरद पवार गट, अजित पवार गट आणि एमआयएमचे नेतेही उपस्थित होते.

काँग्रेसची 'त्याग' करण्याची तयारी

दरम्यान, 21 नगरसेवक असलेल्या काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. "आम्हाला कोणतेही पद नको, फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे," असा प्रस्ताव काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि वंचितला दिला आहे.

अकोला महापालिकेचे पक्षीय बलाबल (एकूण जागा: 80) 

भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02  

हेही वाचा – PCMC Mayor : पिंपरी-चिंचवडमध्ये आरक्षण जाहीर अन् हालचालींना वेग; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंचा प्रबळ दावा

किंगमेकर कोण ठरणार?

भाजपने सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साद घातली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून प्रकाश आंबेडकरांच्या 5 आणि ठाकरेंच्या 6 नगरसेवकांच्या मदतीने भाजपला शह देण्याची तयारी केली आहे. जर वंचित आणि ठाकरे गट एकत्र आले, तर अकोल्यात भाजपची सत्तेची गणिते बिघडू शकतात. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number