Uddhav Thackeray: ‘वाघाचं कातडं पांघरलेला गद्दार…’; परभणीत उद्धव ठाकरेंचा संजय जाधवांवर निशाणा

खासदार संजय जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Uddhav Thackeray: ‘वाघाचं कातडं पांघरलेला गद्दार…’; परभणीत उद्धव ठाकरेंचा संजय जाधवांवर निशाणा

Uddhav Thackeray: परभणीत झालेल्या राजकीय मेळाव्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे यांनी थेट जनतेत उतरत संघटनबांधणीला वेग दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर परभणीत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. सभेच्या प्रारंभीच त्यांनी उपस्थित प्रचंड गर्दीकडे पाहत, येथे जमलेले लोक कोणाच्या पैशावर आणलेले नसून स्वतःच्या इच्छेने आलेले आहेत, असा टोला विरोधकांना लगावला.

यावेळी खासदार संजय जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरे करत असताना आमदार राहुल पाटील सातत्याने सोबत होते, मात्र संजय जाधव कुठेच दिसले नाहीत, असा दावा त्यांनी केला. स्वतःकडून दुर्लक्ष झाल्याची कबुली देतानाच, वेळेत लक्ष दिले असते तर त्यांच्या हालचाली आधीच समजल्या असत्या, असेही ठाकरे म्हणाले. याच मैदानावर यापूर्वी संजय जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मोठी सभा घेण्याचे आवाहन त्यांनी राहुल पाटील यांना केले. "मी वर केलेल्या 2 हातांपैकी 1 हात आजही निष्ठेने उभा आहे, तर वाघाचे कातडे पांघरलेला दुसरा व्यक्ती पळून गेला," अशा शब्दांत त्यांनी जाधवांवर निशाणा साधला.

दरम्यान, पक्षांतर केलेल्या खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. लोकसभा अध्यक्षांकडे आम्ही अधिकृतरित्या पत्र देऊन आमची बाजू मांडल्याचे त्यांनी सांगितले. संविधान आणि कायद्याचे राज्य कायम ठेवायचे असेल, तर पक्ष सोडून गेलेल्या 6 खासदारांचे सदस्यत्व रद्द झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. लोकसभा अध्यक्षांनी स्वतःच घटनात्मक जबाबदारी पार पाडली नाही, तर इतरांना कायद्याचा धडा देण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहणार नाही, असे सांगत त्यांनी अध्यक्षांनी संविधानाचे संरक्षण करावे, अन्यथा इतिहासात त्यांची नोंद वेगळ्या पद्धतीने होईल, असा इशाराही दिला.

हेही वाचा – Cabinet Reshuffle 2026: 'त्या' 6 खासदारांपैकी एकाला मिळणार दिल्लीत मंत्रिपद? आमदार रोहित पवारांचा मोठा दावा

दरम्यान, भाजपवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही जोरदार टीका केली. राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेने चांदीची वीट अर्पण केली होती, मात्र भाजपचा उद्देश मंदिर उभारण्यापेक्षा प्रभू रामाच्या नावाचा राजकीय वापर करून स्वतःचा फायदा करून घेण्याचा होता, असा आरोप त्यांनी केला. हिंदू समाजाने 'जय श्रीराम'च्या घोषणेवर विश्वास ठेवला, परंतु त्याच विश्वासाशी विश्वासघात करण्यात आल्याचे ते म्हणाले. बाबरी पाडणाऱ्यांचा उल्लेख करत, आता राम मंदिराच्या नावावर राजकारण करणारी 'बाबर जनता पार्टी' निर्माण झाली आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. 'राम मंदिराच्या नावाचा वापर करून राजकारण करणाऱ्यांमध्ये आणि बाबरामध्ये नेमका फरक काय?' असा थेट सवालही त्यांनी भाजपला केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number