MNS vs Thackeray Sena : ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा; मुंबईतील ‘या’ वॉर्डात मनसे आणि ठाकरे गट आमनेसामने

या वार्डमध्ये मनसेकडून कुशल धुरी यांना उमेदवारी देण्यात आली असून ठाकरे गटाकडून शरद जाधव यांना संधी देण्यात आली आहे.

MNS vs Thackeray Sena : ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा; मुंबईतील ‘या’ वॉर्डात मनसे आणि ठाकरे गट आमनेसामने

MNS vs Thackeray Sena : ज्या युतीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीत मुंबईत एका जागेवरून पेच निर्माण झाला आहे. जागावाटपाचा तिढा सुटला असे वाटत असतानाच, वॉर्ड क्रमांक 67 मध्ये दोन्ही पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार मैदानात उतरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

नेमका पेच काय?

मुंबईतील 227 जागांसाठी ठाकरे गट आणि मनसेमध्ये समझोता झाला असला तरी, अंधेरी पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक 67 मध्ये मात्र दोन्ही बाजूंनी 'एबी' फॉर्म देण्यात आले आहेत. छाननी प्रक्रियेनंतर महापालिकेने जाहीर केलेल्या यादीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे असल्याने युतीमध्ये 'माशी शिंकली' असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – PMC Election : पुण्यात गँगवॉरचा भडका आता निवडणूक मैदानात! आंदेकर आणि कोमकर कुटुंबे एकमेकांसमोर

या वार्डमध्ये मनसेकडून कुशल धुरी यांना उमेदवारी देण्यात आली असून ठाकरे गटाकडून शरद जाधव यांना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांनी अधिकृत अर्ज भरल्याने आता 5 तारखेपासून होणाऱ्या सभांच्या धडाक्यापूर्वीच या जागेचा तिढा सोडवण्याचे आव्हान दोन्ही नेत्यांसमोर आहे.

चौरंगी लढत रंगणार 

केवळ ठाकरे बंधूच नव्हे, तर या वॉर्डात इतरही तगडे उमेदवार रिंगणात आहेत. 

भाजप: दीपक कोतेकर
समाजवादी पार्टी: प्रकाश कोकरे
वंचित बहुजन आघाडी: पीर मोहम्मद शेख

हेही वाचा – BMC Election 2026 : मुंबईचा महापौर उत्तर भारतीय की मराठी? नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ

या वॉर्डात एकूण 12 उमेदवार नशीब आजमावत असून मनसे, ठाकरे गट, भाजप आणि वंचित यांच्यातील ही लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या, 2 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. जर उद्यापर्यंत या दोन्हीपैकी एका उमेदवाराने माघार घेतली नाही, तर मुंबईत या एका जागेवर ठाकरे बंधूंच्या सैन्यात 'मैत्रीपूर्ण लढत' पाहायला मिळेल. जागावाटपानुसार ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला होती, हे उद्याच्या माघारीनंतरच स्पष्ट होईल.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number