Eknath Shinde : निरोपाचा हळवा क्षण! एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा ‘साहेब’ असा केला उल्लेख; दिल्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा

विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला सारून शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'साहेब' असा करत त्यांना निरोगी दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.<br/>

Eknath Shinde : निरोपाचा हळवा क्षण! एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा ‘साहेब’ असा केला उल्लेख; दिल्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा

Eknath Shinde Speech:  महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आज सभागृहात त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरोपाचा प्रस्ताव मांडताना अत्यंत संवेदनशील आणि मनाला भिडणारे भाषण केले. विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला सारून शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘साहेब’ असा करत त्यांना निरोगी दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

‘राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो’
एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, “आज आपण सगळे एका हळव्या वळणावर उभे आहोत. निरोपाचा क्षण कितीही टाळला तरी तो टाळता येत नाही. प्रवास असो वा विधिमंडळाचा सहवास, थांबा आला की थांबावेच लागते.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाक्याचा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की, राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो. सभागृहातून निवृत्त झाले तरी जनसेवेचे कार्य निरंतर सुरू राहते. आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोरे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केरेकर यांचा समावेश आहे.

नीलम गोरे: सलग 24 वर्षांचा विक्रमी प्रवास
शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती डॉ. नीलम गोरे यांच्या कार्याचा गौरव करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांनी सलग 24 वर्षे या सभागृहाचे सदस्य राहून व्ही. एस. पागे यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. एक महिला म्हणून उपसभापती पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. “नीलम ताईंचा तोल कधी जात नाही, त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे. पुण्याच्या असल्यामुळे बाकरवडीचा पाहुणचार करण्यातही त्या कधी कमी पडत नाहीत,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अमोल मिटकरी: बुलंद आवाज आणि मायाळू स्वभाव
विदर्भातील ‘फायर ब्रँड’ नेते अमोल मिटकरी यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री भावूक झाले. “मिटकरींचा आवाज बुलंद आहे. ते वरून तापट वाटले तरी आतून अत्यंत मायाळू आहेत,” असे शिंदे यांनी नमूद केले. दिवंगत नेते अजित पवार (दादा) आज सोबत असते तर त्यांनी मिटकरींचे तोंडभरून कौतुक केले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मिटकरींच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा उल्लेख करत त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – Trupti Desai : भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण कसं उघड केलं? तृप्ती देसाईंनी सांगितली लैंगिक शोषण आणि फसवणुकीची धक्कादायक ‘इनसाईड स्टोरी’

शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व
निवृत्त होणाऱ्या सर्वच नऊ सदस्यांनी आपापल्या क्षेत्रात आणि सभागृहात मोलाचे योगदान दिले आहे. संघर्षातून नेतृत्व उभे केलेले हे सर्व सदस्य पुन्हा सभागृहात येतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number