Karnataka New CM: कर्नाटकात नव्या पर्वाची सुरुवात; डी.के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, जी. परमेश्वर बनले उपमुख्यमंत्री

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि दक्षिण भारतातील पक्षाचे मान्यताप्राप्त 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे डी.के. शिवकुमार यांनी आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Karnataka New CM: कर्नाटकात नव्या पर्वाची सुरुवात; डी.के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, जी. परमेश्वर बनले उपमुख्यमंत्री

Karnataka New CM: कर्नाटकच्या राजकारणात आज एका नव्या आणि ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि दक्षिण भारतातील पक्षाचे मान्यताप्राप्त 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे डी.के. शिवकुमार यांनी आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बंगळुरू येथील विधानसौध संकुलातील भव्य 'ग्लास हाऊस'मध्ये आयोजित एका दिमाखदार समारंभात, राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासोबतच ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य 12 प्रमुख मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डी.के. यांचे अभिनंदन
डी.के. शिवकुमार यांच्या शपथविधी समारंभांनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, "श्री डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कर्नाटक सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम करेल."

हेही वाचा – Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना भारतात येताच अटक होणार? असीम सरोदेंच्या वक्तव्याने देशभर खळबळ

प्रदीर्घ संघर्षानंतर डी.के. यांचे स्वप्न साकार
या ऐतिहासिक क्षणासोबतच, आठ वेळा आमदार राहिलेल्या डी.के. शिवकुमार यांचे मुख्यमंत्री बनण्याचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. या सर्वोच्च पदासाठी त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि राजकीय आखाड्यात प्रदीर्घ संघर्ष केला होता. या भव्य शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांच्यासह देशभरातील अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number