BSNL Vi Merger: टेलिकॉम सेक्टरमध्ये ‘महाविलीनीकरण’! BSNL आणि Vi एकत्र येणार? जिओ-एअरटेलचे टेन्शन वाढणार

सरकारी मालकीची कंपनी BSNL आणि खाजगी क्षेत्रातील 'Vi' (Vodafone Idea) यांच्यात विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे.

BSNL Vi Merger: टेलिकॉम सेक्टरमध्ये ‘महाविलीनीकरण’! BSNL आणि Vi एकत्र येणार? जिओ-एअरटेलचे टेन्शन वाढणार

BSNL Vi Merger:  भारतीय दूरसंचार (Telecom) क्षेत्रात लवकरच एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीची कंपनी BSNL आणि खाजगी क्षेत्रातील 'Vi' (Vodafone Idea) यांच्यात विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. स्पेक्ट्रम सामायिकरण आणि फायबर नेटवर्कच्या विस्तारासाठी दोन्ही कंपन्या एकत्र येण्याच्या तयारीत असून, यामुळे ग्राहकांना दर्जेदार नेटवर्क आणि हाय-स्पीड इंटरनेट मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

संसदीय समितीकडून विलीनीकरणाच्या वृत्ताला दुजोरा
Mint च्या अहवालानुसार, दूरसंचार सचिव समित गोयल यांनी संसदीय स्थायी समितीला या चर्चेबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 16 मार्च रोजी लोकसभेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या दस्तऐवजानुसार, खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दूरसंचार विभागाला या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या टेलिकॉम मार्केटमध्ये Jio (480 दशलक्ष ग्राहक) आणि Airtel (430 दशलक्ष ग्राहक) यांचे वर्चस्व आहे. या दोन दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी BSNL आणि Vi ने एकत्र येण्याचा विचार सुरू केला आहे.

नेटवर्क विस्तार आणि 5G सज्जता
Vi ने गेल्या वर्षापासून आपल्या 5G सेवांचा विस्तार सुरू केला आहे, मात्र थकीत AGR देयकांमुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर ताण आहे. दुसरीकडे, BSNL ने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभर 4G सेवा विस्तारली असून, त्यांची यंत्रणा '5G-Ready' आहे. जर हे विलीनीकरण प्रत्यक्षात आले, तर BSNL चे स्वदेशी तंत्रज्ञान आणि Vi कडे असलेले स्पेक्ट्रम यांचा मेळ बसून देशात एक सक्षम तिसरा पर्याय उभा राहू शकतो.

हेही वाचा – American Visa : अमेरिकेचा 50 देशांना दणका! व्हिसासाठी आता भरावा लागेल 15,000 डॉलर्सचा बाँड; भारत-पाकिस्तान या यादीत आहेत का?

बाजारातील स्पर्धा आणि ग्राहकांचा फायदा
2016 मध्ये Jio च्या आगमनानंतर अनेक कंपन्यांना आपले गाशा गुंडाळावा लागला होता. त्यावेळी Vodafone आणि Idea एकत्र येऊन 'Vi' तयार झाली होती. मात्र, तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे Vi ग्राहकांच्या संख्येत पिछाडीवर पडली. आता BSNL सोबतच्या संभाव्य भागीदारीमुळे ग्रामीण भागातील BSNL चे मजबूत जाळे आणि शहरी भागातील Vi ची उपस्थिती यांचा फायदा दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना मिळू शकतो. यामुळे कॉल ड्रॉपच्या समस्या कमी होऊन ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number