KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला मोठे भगदाड; उपशहर अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती धरला आहे.

KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला मोठे भगदाड; उपशहर अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

KDMC Election 2026: महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती धरला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे डोंबिवलीतील मनसेची संघटनात्मक बांधणी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणी सोडली साथ?

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
योगेश म्हात्रे (उपशहर अध्यक्ष, डोंबिवली)
अनिकेत गायकवाड व दिपेश धुरी (शाखा अध्यक्ष)
चैतन्य सावंत (शहर सचिव, मनविसे)
सर्वेश लोंढे (विभाग सचिव) सह योगेश पडवळ, निलेश निरकर, अनिकेत सावंत, अभिषेक गायकवाड आणि रोहन वगळ यांसारख्या तरुण कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याला भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते.

हेही वाचा – Solapur Election 2026: ओवैसींच्या समोर माजी नगरसेवक ढसाढसा रडला; सोलापूरच्या सभेत नेमकं काय घडलं?

मनसेला सलग दोन दिवस धक्क्यांवर धक्के

राज ठाकरे यांच्यासाठी गेल्या 24 तासांतील घडामोडी अत्यंत चिंताजनक ठरल्या आहेत. मुंबईत मनसेचे फायरब्रँड नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून गळतीची सुरुवात केली. ठाकरेंसोबतच्या युतीमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तथापी, मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक राजाभाऊ चौगुले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत प्रवक्ते हेमंत कांबळे आणि चित्रपट सेनेचे पदाधिकारीही बाहेर पडले. तथाी, आज डोंबिवलीतील उपशहर अध्यक्षांसह संपूर्ण फळी भाजपमध्ये सामील झाल्याने मनसेला सावरण्याची संधीही मिळेनाशी झाली आहे.

हेही वाचा – Imtiaz Jaleel Statement: हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण? जलील यांनी सांगितली हल्लेखोरांची नावे

निवडणुकीवर काय परिणाम होणार?

कल्याण-डोंबिवली हा मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी साथ सोडल्यामुळे मनसेच्या मतपेटीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, या इनकमिंगमुळे भाजपची ताकद दुप्पट झाली असून, युती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढतीत भाजपला डोंबिवलीत आघाडी मिळण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number