Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर ‘या’ ठिकाणी साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; 350 कोटींचा मास्टरप्लॅन

गुजरात येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर या स्मारकाची भव्य निर्मिती केली जाणार असून, यासाठी शासनाने तब्बल 350 कोटी रुपयांचा सर्वसमावेशक विकास आराखडा मंजूर केला आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial :  ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर ‘या’ ठिकाणी साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; 350 कोटींचा मास्टरप्लॅन

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial: रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गुजरात येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर या स्मारकाची भव्य निर्मिती केली जाणार असून, यासाठी शासनाने तब्बल 350 कोटी रुपयांचा सर्वसमावेशक विकास आराखडा मंजूर केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची घोषणा करत, शिवकालीन इतिहासाचा वारसा जपणारे हे एक प्रमुख केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

शंभर एकर क्षेत्रावर विस्तार करण्याचे नियोजन

सुरुवातीला या प्रकल्पासाठी 4 एकर जागा निश्चित करण्यात आली असली, तरी स्मारकाचा विस्तार 100 एकरपर्यंत वाढवण्याची मागणी पुढे आली आहे. आमदार प्रमोद जठार यांनी या परिसरात शिवकालीन संस्कृतीचे दर्शन घडवणारे आधुनिक संग्रहालय आणि इतिहास संशोधन केंद्र स्थापन करण्याची सूचना केली. 

हेही वाचा – Eknath khadse Bjp Entry: 'केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन आल्यानेच दिल्लीला'; भाजप प्रवेशाच्या वादावर एकनाथ खडसेंचा खळबळजनक खुलासा

या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, पहिल्या टप्प्यात मूळ वाड्याच्या ऐतिहासिक परिसराला प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भागासह आवश्यक अतिरिक्त जमिनीचे संपादन करून प्रकल्पाची व्याप्ती वाढवली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या महत्त्वाकांक्षी स्मारकामुळे कोकणाच्या पर्यटनाला आणि ऐतिहासिक वैभवाला मोठी चालना मिळणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number