Jalgaon Cow Baby Shower: शेतकऱ्याच्या हौसेला मौल नाही! जळगावमध्ये गाईच्या डोहाळ जेवणाचा शाही थाट, पहा व्हिडिओ

निकुंब परिवाराच्या मते गोमाता ही फक्त प्राणी नसून ती आपल्या घरातील एक सदस्य असते. त्यामुळे आम्ही घरातील एका सदस्याप्रमाणे हा सोहळा साजरा केला. <br/>

Jalgaon Cow Baby Shower: शेतकऱ्याच्या हौसेला मौल नाही! जळगावमध्ये गाईच्या डोहाळ जेवणाचा शाही थाट, पहा व्हिडिओ

Jalgaon Cow Baby Shower: जळगाव जिल्ह्यामध्ये एका कुटुंबाने चक्क गाईचे डोहाळे जेवण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले. निकुंब परिवाराने गर्भवती गायीची एका महिलेप्रमाणे पूजा केली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला जवळपास 100 ते 150 लोक उपस्थित होते. यावेळी निकुंब कुटुंबियांचे सर्व नातेवाईक अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. निकुंब परिवाराच्या मते गोमाता ही फक्त प्राणी नसून ती आपल्या घरातील एक सदस्य असते. त्यामुळे आम्ही घरातील एका सदस्याप्रमाणे हा सोहळा साजरा केला.    

जळगावमध्ये गाईचे डोहाळे जेवण हा एक अनोखा आणि लोकप्रिय कार्यक्रम आहे, जिथे गर्भवती गायीची एका महिलेप्रमाणे पूजा केली जाते, तिला सजवले जाते आणि गायीची ओटी भरली जाते. तसेच गोमातेसाठी खास जेवण बनवले जाते. या सोहळ्यात पारंपरिक विधी, संगीत आणि महिलांकडून ओटी भरणे (जसे की नवीन साडी, नारळ देणे) यांसारखे कार्यक्रम केले जातात, जे शेती संस्कृती आणि गाईबद्दलचा आदर दर्शवतात. 

हेही वाचा – BMC Election 2025 : जागावाटपावरून सेनेत नाराजीचा सूर, 125 जागांची मागणी, भाजपकडून फक्त 52 फायनल?; स्वबळासाठी पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंवर दबाव

गोमातेची खास सजावट  

दरम्यान, डोहाळे जेवणासाठी गायीची खास सजावट करण्यात आली होती. गायीची शिंगे रंगवण्यात आली होती, गळ्यात घुंगरू आणि तोडे घाण्यात आले होते. यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने गायीची ओटी भरली, ज्यात साडी, नारळ आणि इतर वस्तूंचा समावेश होता. तसेच गायीच्या डोहाळे जेवणासाठी खास, पचायला हलके आणि पौष्टिक पदार्थ बनवण्यात आले होते. तथापी, अनेकदा गोमातेच्या डोहाळे जेवणात ‘छप्पन भोग’ देखील तयार केले जातात.

हेही वाचा – Mumbai Pune Expressway: घाटातील कोंडीला कायमचा ब्रेक, मुंबई-पुणे आता अवघ्या 90 मिनिटांत; नितीन गडकरींकडून नव्या एक्सप्रेसवेचं अनावरण


 
गायीचे डोहाळे जेवण करण्यामागील उद्देश  

गाईला केवळ पशुधन न मानता कुटुंबातील सदस्य मानणे हा यामागील खास उद्देश आहे. तथापी, कृषी संस्कृतीचे जतन करणे आणि गाईबद्दलचा आदर व्यक्त करणे. गायीच्या सुखरूप प्रसूतीसाठी आणि तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणे, हा देखील यामागील उद्देश असतो. हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या गाईबद्दलच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number