Solapur Election 2026: ओवैसींच्या समोर माजी नगरसेवक ढसाढसा रडला; सोलापूरच्या सभेत नेमकं काय घडलं?

22 उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भव्य सभा सोलापुरात पार पडली. मात्र, या सभेत राजकीय भाषणापेक्षा माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांच्या अश्रूंचीच चर्चा अधिक रंगली.<br/>

Solapur Election 2026: ओवैसींच्या समोर माजी नगरसेवक ढसाढसा रडला; सोलापूरच्या सभेत नेमकं काय घडलं?

Solapur Election 2026: आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. 22 उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भव्य सभा सोलापुरात पार पडली. मात्र, या सभेत राजकीय भाषणापेक्षा माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांच्या अश्रूंचीच चर्चा अधिक रंगली.

नेमकं काय घडलं?

माजी नगरसेवक गाजी जहागीरदार जेव्हा भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांना सोलापूरचे माजी शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांची आठवण झाली. शाब्दी यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिल्याने जहागीरदार भावूक झाले. फारूक शाब्दी यांना पक्षात परत आणा, मला त्यांची खूप आठवण येत आहे, असे म्हणत ते ओवैसींच्या समोरच ढसाढसा रडू लागले.

हेही वाचा – Imtiaz Jaleel Statement: हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण? जलील यांनी सांगितली हल्लेखोरांची नावे

ओवैसींचा कडक पवित्रा; रडत बसू नका 

कार्यकर्ता रडत असल्याचे पाहून ओवैसींनी तात्काळ हस्तक्षेप केला. त्यांनी जहागीरदार यांना सावरले, पण सोबतच एक कडक राजकीय संदेशही दिला. ओवैसी म्हणाले, "मी मेलो तरी एमआयएम पक्षाचे काम सुरूच राहिले पाहिजे. पक्षातून कोणी गेले तरी रडत बसायचे नाही, तर जिद्दीने लढायचे असते."

हेही वाचा – Imtiaz Jaleel Attack: संभाजीनगर हादरलं! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला; MIM च्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

फारूक शाब्दी यांच्या राजीनाम्याने निर्माण झालेली पोकळी

सोलापूर आणि मुंबईत मोठा जनाधार असलेले फारूक शाब्दी यांनी 28 डिसेंबर रोजी राजीनामा दिल्याने एमआयएमला मोठा धक्का बसला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला कडवी झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. ऐन महापालिका निवडणुकीत त्यांचा अभाव कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहे. दरम्यान, फारूक शाब्दी यांच्या राजीनाम्यावर ओवैसींनी जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी अद्याप फारूक शाब्दी यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मी स्वतः शाब्दींचे वडील मकबूल शाब्दी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करेन. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number