Sanjana Chavan Pregnant: बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या घरी हलणार पाळणा; संजनाच्या ‘त्या’ इमोशनल व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सूरजची पत्नी संजना चव्हाण हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका विशेष व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, चव्हाण कुटुंबात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहेत.<br/>

Sanjana Chavan Pregnant: बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या घरी हलणार पाळणा; संजनाच्या ‘त्या’ इमोशनल व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Sanjana Chavan Pregnant: ‘बिग बॉस मराठी 5’ चा लाडका विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. सूरजची पत्नी संजना चव्हाण हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका विशेष व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, चव्हाण कुटुंबात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संजनाने एक खास फोटोशूट शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये तिने परिधान केलेल्या साडीत तिचा ‘बेबी बंप’ स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. मात्र, केवळ दृश्यच नाही तर तिने वापरलेल्या ओळींनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. संजनाने या व्हिडिओला एक भावनिक ऑडिओ जोडला आहे, ज्यामध्ये ती म्हणते, “अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते… आता फक्त तुझ्या पहिल्या श्वासाची आणि त्या छोट्याशा हास्याची वाट पाहतेय बाळा!” अनेकदा डोहाळे जेवणाच्या व्हिडिओंना वापरले जाणारे हे गाणे आणि संजनाचे शब्द ती आई होणार असल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.

लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यांत ‘गुड न्यूज’
सूरज आणि संजना यांचा विवाह डिसेंबर महिन्यात पार पडला होता. संजना ही सूरजच्या मामाची मुलगी असून लग्नानंतर हे जोडपे सुखाने संसार करत आहे. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच ही गोड बातमी समोर आल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे.

हेही वाचा – Nora Fatehi : ‘परवानगीशिवाय केले हिंदी डबिंग’; नोरा फतेहीने ‘त्या’ गाण्यातील अश्लीलतेसाठी निर्मात्यांवर ठेवला ठपका

चाहत्यांची उत्सुकता शिगेला
सूरज आणि संजना अधिकृतपणे ही आनंदाची बातमी कधी जाहीर करणार, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या हे जोडपे त्यांच्या नवीन घरात वास्तव्यास असून त्यांचे रोमँटिक रील व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. आता या नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे सूरजच्या आयुष्यात सुखाची नवी ‘झापूक झुपूक’ लाट येणार, असे दिसतेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number