Nilesh Rane Vs Vaibhav Naik: मातोश्रीवरील बैठकीवरून निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात जुंपली; नेमकं काय घडलं?

मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या खासदारांच्या बैठकीचा दाखला देत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Nilesh Rane Vs Vaibhav Naik: मातोश्रीवरील बैठकीवरून निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात जुंपली; नेमकं काय घडलं?

Nilesh Rane Vs Vaibhav Naik:  मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या खासदारांच्या बैठकीचा दाखला देत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. निलेश राणे म्हणाले, “ठाकरे यांच्या बैठकीला आता कुणीही उपस्थित राहत नाही. त्यांच्या बैठकांमध्ये नेमके किती आमदार आणि खासदार जातात, हे एकदा मोजून बघण्याची गरज आहे. आता लोकांचा आणि त्यांच्या स्वतःच्या नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही.” पुढे बोलताना त्यांनी आठवण करून दिली की, मागे 10 दिवसांपूर्वीही त्यांनी एक बैठक लावली होती, ज्याला अनेक खासदार अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा बैठक घेण्याची नामुष्की ओढवली आहे. तसेच, आमच्याकडे सातत्याने ‘इनकमिंग’ सुरू असून ‘ऑपरेशन टायगर’ सतत चालूच असते, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा – Maharashtra Monsoon Session 2026: मोठी बातमी, पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित; अनेक मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये होणार जोरदार चर्चा

निलेश राणे भाजपमध्ये कधी जातील हे शिंदेंनाही कळणार नाही; वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

दरम्यान, निलेश राणे यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. वैभव नाईक यांनी पलटवार करताना म्हटले की, “निलेश राणे सध्या ज्या पक्षात (शिवसेना- शिंदे गट) आहेत, तो पक्ष कधी फुटेल आणि निलेश राणे स्वतः भाजपमध्ये कधी जातील, हे खुद्द एकनाथ शिंदे यांना देखील कळणार नाही.” आगामी विधानसभा निवडणूक शिंदे गट आणि भाजप हे वेगवेगळे लढतील असा दावा करत नाईक म्हणाले की, निलेश राणे हे शिवसेनेमध्ये फार काळ राहणार नाहीत, तर ते शेवटी आपले वडील नारायण राणे यांच्या पक्षात म्हणजेच भाजपमध्येच प्रवेश करतील.

आता फक्त आमच्या ‘आईसाहेब’ राहिल्या आहेत; नितेश राणेंचा टोला

तथापि, राणे आणि नाईक यांच्यात सुरू असलेल्या या वादावर भाजप आमदार नितेश राणे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या खास शैलीत उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “आमचे निलेश राणे साहेब स्वतः अत्यंत सक्षम आहेत. त्यामुळे निलेशचा राणे साहेबांना, नितेशचा प्रश्न निलेशला…आता फक्त आमच्या आईसाहेब राहिल्या आहेत,” असा खोचक टोलाही यावेळी नितेश राणे यांनी लगावला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number