Nagpur Election : नागपूरमध्ये भाजपची मोठी कारवाई; ‘या’ बड्या नेत्यासह बंडखोरांना दणका देत 32 पदाधिकाऱ्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी

या कारवाईमुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली असून, बंडखोरांना हा कडक इशारा मानला जात आहे.<br/>

Nagpur Election : नागपूरमध्ये भाजपची मोठी कारवाई; ‘या’ बड्या नेत्यासह बंडखोरांना दणका देत 32 पदाधिकाऱ्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी

Nagpur Election : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नागपूर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाची शिस्त मोडून बंडखोरी करणाऱ्या आणि अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या 32 बड्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली असून, बंडखोरांना हा कडक इशारा मानला जात आहे.

माजी महापौरांच्या पतीसह बड्या चेहऱ्यांवर कारवाई

नागपूर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून अपक्ष किंवा इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या 32 जणांना सहा वर्षांसाठी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांच्यासह अनेक जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. अधिकृत उमेदवारांविरुद्ध अर्ज दाखल करणे आणि पक्षविरोधी कारवायांना खतपाणी घातल्याने या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा – Ambernath Election: अंबरनाथ पालिकेत श्रीकांत शिंदेंचा भाजपला मोठा धक्का; अजित पवारांच्या साथीने संपूर्ण गेमचं पालटला

दरम्यान, या कारवाईचे समर्थन करताना दयाशंकर तिवारी यांनी कठोर भूमिका मांडली. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. काही जण स्वार्थासाठी अपक्ष लढत आहेत, तर काही जण दुसऱ्या पक्षाच्या आश्रयाला गेले आहेत. पक्षाच्या ध्येयधोरणांना हरताळ फासणाऱ्या अशा 32 जणांवर आम्ही सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. शिस्त मोडणाऱ्यांची पक्षात कोणतीही जागा नाही. 

हेही वाचा – BMC Election 2026 : भाजप कार्यकर्त्यांच्या '50 खोके'च्या घोषणांमुळे महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदें म्हणाले, 'मला पूर्ण…'

निवडणुकीवर काय परिणाम होणार ?

नागपूर महानगरपालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असताना, ही बंडखोरी पक्षाची डोकेदुखी ठरली होती. कारवाईमुळे पक्षांतर्गत शिस्त तर निर्माण होईल, मात्र या 32 बंडखोर नेत्यांच्या मतपेटीतील प्रभावाचा भाजपला किती फटका बसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नागपूरमधील या कारवाईनंतर आता राज्यातील इतर शहरांमधील बंडखोरांचे धाबे दणाणले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number