Hawala Racket Busted: रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटींची रक्कम; कोट्यवधींचा व्यवहार पाहून ED अधिकारीही चक्रावले

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासात अत्यंत धक्कादायक तथ्ये समोर आली असून, एका सामान्य रिक्षाचालकाचा वापर करून कोट्यवधी रुपयांची लाँड्रिंग केल्याचे उघड झाले आहे.

Hawala Racket Busted: रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटींची रक्कम; कोट्यवधींचा व्यवहार पाहून ED अधिकारीही चक्रावले

Hawala Racket Busted: अहमदाबादमध्ये बेकायदेशीर क्रिकेट सट्टेबाजी आणि शेअर बाजारातील हेराफेरीशी संबंधित अंदाजे 550 कोटी रुपयांचे मोठे हवाला रॅकेट उघडकीस आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासात अत्यंत धक्कादायक तथ्ये समोर आली असून, एका सामान्य रिक्षाचालकाचा वापर करून कोट्यवधी रुपयांची लाँड्रिंग केल्याचे उघड झाले आहे. ईडीने याप्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली असून सखोल तपास सुरू केला आहे.

महिन्याला 12 हजार कमावणाऱ्या रिक्षाचालकाचा '300 कोटीं'चा खेळ
तपासादरम्यान दीप ओड या रिक्षाचालकाच्या बँक खात्यात 300 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, दीप हा महिन्याला केवळ 10,000 ते 12,000 रुपये कमवतो. सट्टेबाजी आणि शेअर बाजारातील काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्याचे खाते भाड्याने वापरले जात होते. दीपने कबूल केले की, त्याने त्याचे बँक खाते करण परमार उर्फ लाला याला 25,000 रुपयांच्या मोबदल्यात दिले होते, तसेच प्रत्येक चेकवर स्वाक्षरी करण्यासाठी त्याला 400 रुपये मिळत होते.

हेही वाचा – Austin Bar Shooting: टेक्सास गोळीबारात भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीचा मृत्यू; हल्लेखोराच्या 'इराण कनेक्शन'ने अमेरिकेत खळबळ

कागदोपत्री कंपन्या आणि 550 कोटींचे मायाजाल
या रॅकेटमध्ये केवळ रिक्षाचालकाचाच नव्हे, तर त्याच्या कागदपत्रांचा वापर करून 'दीप एंटरप्रायझेस' नावाची बनावट फर्मही तयार करण्यात आली होती. याव्यतिरिक्त 'कमलेश ट्रेडिंग' आणि 'रोनक ट्रेडर्स' यांसारख्या कंपन्या केवळ कागदावर दाखवून 2024 मध्ये उघडलेल्या खात्यांतून तब्बल 550 कोटींचे व्यवहार करण्यात आले. प्रत्यक्षात या कंपन्या कोणताही व्यवसाय करत नव्हत्या. ऑनलाइन क्रिकेट बेटिंगमधून मिळणारा पैसा या खात्यांमधून वळवण्यात येत होता.

शेअर बाजारातील फेरफार; 12 महिन्यांत 10,000 टक्के वाढ
ईडीच्या तपासात शेअर बाजारातील एक भयंकर लबाडीही समोर आली आहे. 'सर्क्युलर ट्रेडिंग'द्वारे शेअर्सच्या किमती कृत्रिमरित्या वाढवल्या जात होत्या. फक्त 12 महिन्यांच्या कालावधीत एका कंपनीच्या शेअर्सची किंमत 10,000 टक्क्यांनी वाढवण्यात आली. या असामान्य वाढीमुळे सेबीने (SEBI) संबंधित स्टॉकमध्ये व्यापार करण्यास बंदी घातली असून स्वतंत्र तपास सुरू केला आहे. तपासात 80.50 कोटी, 52.11 कोटी आणि 22.86 कोटी रुपये विविध बनावट कंपन्यांना हस्तांतरित केल्याचे पुरावे सापडले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number