Political News: राजकारणात मोठा भूकंप: 3 आमदारांचे थेट राजीनामे; या पक्षात केला प्रवेश, आता चार जागांवर होणार पोटनिवडणूक

टीव्हीकेची स्वतःची ताकद वाढल्यामुळे सरकार चालवण्यासाठी त्यांची मित्रपक्षांवर असणारी अनपेक्षित निर्भरता आता बऱ्याच अंशी कमी होणार आहे.

Political News: राजकारणात मोठा भूकंप: 3 आमदारांचे थेट राजीनामे; या पक्षात केला प्रवेश, आता चार जागांवर होणार पोटनिवडणूक

Tamil Nadu political crisis 2026 : तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून सध्याची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेते आणि 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे प्रमुख थलपती विजय हे राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकमध्ये मोठी खिंडार पडली असून, त्यांच्या 3 प्रमुख आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे सुपूर्द केल्यानंतर या तिन्ही नेत्यांनी अधिकृतपणे सत्ताधारी टीव्हीके पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे आता राज्यातील त्रिची ईस्टसह एकूण 4 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

पक्षांतर करणारे आमदार आणि त्यांच्या विजयाचा इतिहास
अण्णाद्रमुकचे सर्वेसर्वा एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला विधानसभा निवडणुकीत एकूण 47 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री विजय यांच्या फ्लोअर टेस्टदरम्यान हा पक्ष दोन गटांत विभागला गेला होता. आता राजीनामा देऊन टीव्हीकेमध्ये गेलेल्या तीन आमदारांमध्ये दोन महिला आमदारांचा समावेश आहे. मरगथम कुमारवेल (मदुरंतकम विधानसभा) यांनी गेल्या निवडणुकीत टीव्हीके TVK पक्षाच्या उमेदवाराचा 7194 मतांच्या फरकाने पराभव केला होता. जयकुमार (पेरुनदुरई विधानसभा) यांनी द्रमुक DMK पक्षाच्या उमेदवारावर 9693 मताधिक्य मिळवून विजय मिळवला होता. सत्यभामा (धारापुरम विधानसभा) यांनी द्रमुकच्या उमेदवाराचा तब्बल 16727 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

विधानसभा अध्यक्षांकडून तातडीने राजीनामे मंजूर
अण्णाद्रमुकच्या आमदारांच्या या राजीनाम्यांवर तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष जे सी डी प्रभाकर यांनी अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले की, मरगथम कुमरावल, सत्यभामा आणि जयकुमार या तिन्ही आमदारांचे राजीनामे तात्काळ मंजूर करण्यात आले आहेत. आमदारांनी सादर केलेली राजीनामा पत्रे पूर्णपणे कायदेशीर आणि विधानसभेच्या नियमांनुसार योग्य क्रमात आढळली आहेत. संविधानाच्या नियमांनुसार राजीनामा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपले पद सोडण्याचे कोणतेही वैयक्तिक कारण सांगणे बंधनकारक नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा – Modi Government: मोदी सरकारची 12 वर्षे पूर्ण! कलम 370 ते राम मंदिर… जाणून घ्या देशाची दिशा बदलणारे 12 मोठे निर्णय

विजय यांच्या सरकारला मिळणार भक्कम स्थैर्य
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके TVK पक्षाने 108 जागा जिंकल्या होत्या. परंतु, विजय यांनी स्वतः त्रिची ईस्ट या मतदारसंघाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या आमदारांची संख्या 107 वर आली होती. जर आगामी पोटनिवडणुकीत टीव्हीकेने या 4 जागांवर विजय मिळवला, तर हा पक्ष बहुमताच्या अगदी जवळ पोहोचेल. यापूर्वी एएमएमकेपक्षाचे आमदार एस कामराज यांनीही पक्षातून निलंबित झाल्यानंतर विजय यांना पाठिंबा दिला आहे. टीव्हीकेची स्वतःची ताकद वाढल्यामुळे सरकार चालवण्यासाठी त्यांची मित्रपक्षांवर असणारी अनपेक्षित निर्भरता आता बऱ्याच अंशी कमी होणार आहे.

मित्रपक्षांचा दबाव आणि तमिळनाडूचे भावी राजकारण
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री विजय यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता, तेव्हा डाव्या पक्षांनी अण्णाद्रमुकच्या आमदारांना सरकारमध्ये मंत्रीपद दिल्यास पाठिंब्याचा पुनर्विचार करण्याची उघड धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, अण्णाद्रमुकच्या या 3 आमदारांनी थेट आमदारकीचा राजीनामा देऊन, पुन्हा निवडणुकीला सामोरे जात टीव्हीके पक्षामध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राजीनामा देऊन टीव्हीकेच्या जवळ गेलेले हे आमदार मंत्री आधव अर्जुन यांच्या संपर्कात होते. जर हे तिन्ही नेते पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले, तर विजय यांच्या सरकारला मजबुती येणार आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi: 'तेव्हा काँग्रेस चुकली, म्हणूनच प्रादेशिक पक्ष जन्माला आले…'; राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number