Rahul Gandhi: ’10 वर्षांत 152 पेपर लीक…’; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

गेल्या 10 वर्षांच्या काळात तब्बल 152 विविध परीक्षांचे पेपर फुटल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण शैक्षणिक ढाचा विस्कळीत झाल्याचे स्पष्ट केले.

Rahul Gandhi: ’10 वर्षांत 152 पेपर लीक…’; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

Rahul Gandhi:  देशातील ढासळत्या शिक्षण व्यवस्थेवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. गेल्या 10 वर्षांच्या काळात तब्बल 152 विविध परीक्षांचे पेपर फुटल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण शैक्षणिक ढाचा विस्कळीत झाल्याचे स्पष्ट केले. इतक्या मोठ्या प्रमाणात पेपरफुटीच्या घटना घडूनही दोषींवर कठोर कारवाई झाली नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लोकशाही मार्गाने आणि शांततेत आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक का दिली जात आहे, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार ताशेरे ओढले.

'नीट' परीक्षेवरील खर्च देशाच्या एकूण शिक्षण बजेटपेक्षाही जास्त 
पेपरफुटीच्या या मालिकेमुळे सुमारे 7.5 कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे भवितव्य अंधारात सापडले असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. पालकांच्या आर्थिक शोषणावर भाष्य करताना ते म्हणाले की, केवळ 'NEET' परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातील कुटुंबे तब्बल 1.32 लाख कोटी रुपये खर्च करतात, तर दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचे एकूण शिक्षण बजेट हे 1.3 लाख कोटी रुपये आहे. एवढा अथांग पैसा आणि मेहनत ओतूनही पेपर लीक होत असतील, तर विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याशिवाय दुसरं काय घडणार, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

आंदोलक मुलींवर लाठीचार्ज अन् पोलिसांकडून छर्रेमार
'कॉकरोच जनता पार्टी'च्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचे चित्रीकरणच राहुल गांधींनी पत्रकारांसमोर मांडले. या व्हिडिओंमध्ये पोलीस महिला आंदोलकांना मारहाण करताना आणि बंदुकीचा वापर करताना दिसत आहेत. एका तरुणाच्या अंगात छर्रे घुसल्याचे पुरावे सादर करत त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा पर्दाफाश केला.

हेही वाचा – Supreme Court: 'न्यायालयाचा वेळ अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवू नका'; पोलिस अत्याचाराबाबतची याचिका ऐकण्यास सरन्यायाधीशांचा नकार

राहुल गांधींनी मांडल्या तीन प्रमुख मागण्या

शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा: आपली जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर तात्काळ राजीनामा द्यावा.

दोषी पोलिसांवर कारवाई: शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि मुलींवर लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

पंतप्रधानांनी मौन सोडावे: संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवेदनशील विषयावर देशासमोर आपली भूमिका स्पष्ट करावी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number