उत्तराखंडमध्ये पराभूत होऊनही धामीच मुख्यमंत्रीपदी

उत्तराखंडमध्येही भाजपाचा दमदार विजय झाल्यानंतर उत्तराखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण असा सवाल उपस्थित होत होता. दरम्यान, उत्तराखंड मुख्यमंत्रीपदाची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पराभूत होऊनही पुष्कर धामी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुष्कर धामी यांची उत्तराखंडच्या भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली असून येत्या २३ मार्च रोजी धामी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याची शक्यता आहे. विधीमंडळ पक्षाच्या […]

उत्तराखंडमध्ये पराभूत होऊनही धामीच मुख्यमंत्रीपदी

उत्तराखंडमध्येही भाजपाचा दमदार विजय झाल्यानंतर उत्तराखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण असा सवाल उपस्थित होत होता. दरम्यान, उत्तराखंड मुख्यमंत्रीपदाची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पराभूत होऊनही पुष्कर धामी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुष्कर धामी यांची उत्तराखंडच्या भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली असून येत्या २३ मार्च रोजी धामी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याची शक्यता आहे.

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी धामी यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर पुष्कर सिंह धामी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपाला बहुमत

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४७ जागांवर बहुमत मिळवले आहेत. तर काँग्रेसला केवळ १९ जागांवर विजय मिळाला आहे. तसेच बहुजन समाज पक्ष आणि अपक्षांना प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number