Iran Suspended Visa-Free: इराणमध्ये भारतीयांसाठी व्हिसामुक्त प्रवेश बंद; काय आहे यामागचं कारण?

2024 मध्ये इराणने भारतीयांसाठी व्हिसा सूट लागू केली होती. मात्र आता हा लाभ संपुष्टात आला असून भारतातील सामान्य पासपोर्टधारक नागरिकांना इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसा आवश्यक असणार आहे.

Iran Suspended Visa-Free: इराणमध्ये भारतीयांसाठी व्हिसामुक्त प्रवेश बंद; काय आहे यामागचं कारण?

Visa Free Entry Suspended In Iran: भारतासाठी मोठी चिंता वाढवणारा निर्णय घेत इराणने भारतीय नागरिकांसाठी असलेली व्हिसा-मुक्त प्रवेश सुविधा 22 नोव्हेंबरपासून निलंबित केली आहे. 2024 मध्ये पर्यटन वाढवण्यासाठी इराणने भारतीयांसाठी व्हिसा सूट लागू केली होती. मात्र आता हा लाभ संपुष्टात आला असून भारतातील सामान्य पासपोर्टधारक नागरिकांना इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसा घेणे अनिवार्य केले आहे.

इराणकडून अधिकृत घोषणा

भारतामधील इराणी दूतावासाने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, “सामान्य पासपोर्ट असलेल्या भारतीय नागरिकांसाठी एकतर्फी व्हिसा-मुक्त सुविधा 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत निलंबित करण्यात आली आहे. या तारखेनंतर भारतीय नागरिकांना इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी, किंवा इराणमार्गे तिसऱ्या देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा घेणे आवश्यक असेल.”

हेही वाचा – Donald Trump: अमेरिकेने भारतानंतर ‘या’ देशालाही दिला मोठा धक्का; ट्रम्प यांच्या निर्णयानंतर मध्यपूर्वेत तणावाचं वातावरण

फसव्या आश्वासनांमुळे वाढत्या समस्या

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारतीय नागरिकांना नोकरी किंवा तिसऱ्या देशात जाण्याच्या खोट्या आश्वासनांखाली इराणमध्ये आणले जात असल्याच्या अनेक घटना त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत.समंत्रालयाने म्हटले आहे की, “व्हिसा-मुक्त प्रवासाचा गैरवापर करून भारतीयांना इराणमध्ये बोलावले गेले. तेथे पोहोचल्यानंतर अनेकांचे अपहरण करून खंडणी मागण्यात आली.” या घटनांमुळे इराण सरकारने गुन्हेगारी रॅकेट्सना रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलत भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सूट बंद केली.

हेही वाचा – Iran Flash Flood after Drought : इराणवर निसर्ग कोपला!; दुष्काळानंतर आलेला पूर, त्यातच 60 जणांचा मृत्यू, हजारो बेघर; 'क्लाउड सीडिंग' नंतर आता..

भारतीय नागरिकांना इशारा 

दरम्यान, 22 नोव्हेंबरपासून भारतीयांना इराणमध्ये प्रवेश, ट्रांझिट किंवा प्रवासासाठी व्हिसा अनिवार्य असेल. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना इशारा दिला आहे की, व्हिसा-मुक्त इराण प्रवासाची ऑफर देणाऱ्या एजंटांच्या मागे लागू नये. तिसऱ्या देशात पाठवण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या बेकायदेशीर एजंटपासून दूर राहावे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number