बारावीचा निकाल बुधवारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.  यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं […]

बारावीचा निकाल बुधवारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.  यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे.

पालकांनाही उत्सुकता आहे. बारावीचं वर्ष विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाचं वर्ष मानलं जातं. बारावीच्या परिक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल अशा घेतल्या गेल्या होत्या. राज्यातल्या १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. आता मात्र त्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे.

देशातले दहावी आणि बारावीचे निकाल याआधीच जाहीर करण्यात आले होते. राज्यात मात्र हे निकाल कधी जाहीर होणार याकडे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. उद्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच दहावीचा निकाल जाहीर होईल अशी पालकांना अपेक्षा आहे. बुधवारी निकाल लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सर्वांना माहिती दिली आहे.

निकाल या वेबसाईटवर पाहू शकता

mahresult.nic.in

mahasscboard.in

results.nic.in

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परिक्षा ऑनलाइन घ्यायच्या की ऑफलाइन घ्यायच्या यावर चर्चा सुरू होत्या. अखेर या परिक्षा ऑफलाइन पद्धतीने झाल्या. या वर्षी परिक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा विचार करुन शाळा तिथे केंद्र ही सुविधा लागू केली होती.

बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number