Kharghar Turbhe Link Road: खारघर ते तुर्भे प्रवास आता अवघ्या 10 मिनिटांत; डोंगर फोडून तयार होणार दुहेरी बोगदा, पाहा कसा असेल नवा मार्ग

सध्या खारघर ते तुर्भे हे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे अर्धा ते पाऊण तास लागतो. मात्र, 5.14 किमी लांबीच्या या नवीन लिंक रोडमुळे हाच प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Kharghar Turbhe Link Road: खारघर ते तुर्भे प्रवास आता अवघ्या 10 मिनिटांत; डोंगर फोडून तयार होणार दुहेरी बोगदा, पाहा कसा असेल नवा मार्ग

Kharghar Turbhe Link Road: नवी मुंबईतील खारघर आणि तुर्भे या दोन महत्त्वाच्या नोड्सना जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित 'लिंक रोड'चे काम आता अत्यंत वेगाने सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून, सप्टेंबर 2028 पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात स्पष्ट केले. सिडकोमार्फत राबवल्या जाणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 2,099 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

प्रवासाचा वेळ 60 टक्क्यांनी वाचणार; अवघ्या 10 मिनिटांत प्रवास
सध्या खारघर ते तुर्भे हे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे अर्धा ते पाऊण तास लागतो. मात्र, 5.14 किमी लांबीच्या या नवीन लिंक रोडमुळे हाच प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे पार्सिक डोंगरातून तयार केले जाणारे 1.7 ते 1.8 किमी लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे. या दुहेरी बोगद्यांचे काम 2025 मध्येच सुरू झाले असून, हा मार्ग तुर्भे सेक्टर 21 (जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ) येथून सुरू होऊन खारघरमधील सेंट्रल पार्क जवळ संपणार आहे.

मुंबई आणि तळोजा एमआयडीसीसाठी नवा दळणवळण मार्ग
या लिंक रोडचा फायदा केवळ स्थानिक नवी मुंबईकरांनाच नाही, तर मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सायन-पनवेल महामार्गाला समांतर असलेला हा मार्ग पुढे तळोजा-पेंधर रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईहून थेट तळोजा एमआयडीसीत जाणे अत्यंत सोपे होईल, ज्याचा फायदा तेथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे. खारघरमधील अंतर्गत रस्ते 30 मीटर रुंद करून ते या लिंक रोडला जोडले जाणार असल्याने वाहतूक अधिक वेगवान होईल.

हेही वाचा – Ritu Tawde : मोठी बातमी! मुंबई महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेत वाढ; नक्की कोणापासून धोका?

विमानतळ आणि मेट्रोशी कनेक्टिव्हिटी: वाहतुकीला मिळणार नवे बळ
हा लिंक रोड कार्यान्वित झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. या मार्गामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच, हा मार्ग थेट मेट्रो मार्गाशी जोडला जाणार असल्याने प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विविध वाहतूक पर्यायांचा वापर करणे सोपे होईल. नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number