Mhada Mumbai Lottery 2026 : मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाच्या 2640 सदनिकांसाठी ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

यामध्ये म्हाडाने स्वतः बांधलेली 1762 घरे, पुनर्विकास प्रकल्पातून प्राप्त झालेला 371 घरांचा साठा आणि मागील सोडतींमधील रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश आहे.<br/>

Mhada Mumbai Lottery 2026 : मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाच्या 2640 सदनिकांसाठी ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

Mhada Mumbai Lottery 2026 :  मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मोठी खुशखबर दिली आहे. मुंबई मंडळांतर्गत विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी अधिकृत सोडत जाहीर करण्यात आली असून, यासाठीची नोंदणी प्रक्रिया 30 मार्च 2026 पासून दुपारी 3.00 वाजेपासून सुरू होणार आहे.

प्रमुख तारखा आणि वेळापत्रक
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे या प्रक्रियेचा प्रारंभ होईल.
अर्ज नोंदणी प्रारंभ: 30 मार्च 2026 (दुपारी 3.00 वाजता)
अर्ज करण्याची अंतिम मुदत: 29 एप्रिल 2026 (रात्री 11.59 पर्यंत)
अनामत रक्कम भरण्याची मुदत: 30 एप्रिल 2026
प्रारूप यादी प्रसिद्धी: 05 मे 2026
अंतिम स्वीकृत यादी: 12 मे 2026
सोडतीचा निकाल (लॉटरी): 15 मे 2026 (सकाळी 11.00 वाजता)

कुठल्या भागात आहेत घरे?
विक्रोळीतील कन्नमवार नगर, गोरेगावची पत्राचाळ (सिद्धार्थ नगर), बोरीवली (गोराई व मागाठाणे), चेंबूर, वांद्रे (गांधीनगर), घाटकोपर (पंतनगर), गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आणि अँटॉप हिल यांसारख्या मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत.

गटनिहाय घरांची उपलब्धता
अत्यल्प उत्पन्न गट (EWS): 145 सदनिका
अल्प उत्पन्न गट (LIG): 858 सदनिका
मध्यम उत्पन्न गट (MIG): 1408 सदनिका
उच्च उत्पन्न गट (HIG): 229 सदनिका

यामध्ये म्हाडाने स्वतः बांधलेली 1762 घरे, पुनर्विकास प्रकल्पातून प्राप्त झालेला 371 घरांचा साठा आणि मागील सोडतींमधील रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश आहे.

हेही वाचा – LPG Cylinders Stolen: मुंबईत गॅस सिलेंडर चोरांचा सुळसुळाट; कांदिवलीत उभ्या टेम्पोतून 27 सिलेंडर लंपास, पोलिसांकडून विशेष पथकं तैनात

अर्ज कसा करावा?
इच्छुक अर्जदारांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in) जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. माहिती पुस्तिका देखील याच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number