Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रोचा मार्ग मोकळा; केंद्राची मंजुरी, पण 5 हजारांहून अधिक झाडांवर चालणार कुऱ्हाड

खाडी व कांदळवन क्षेत्रावरून जाणाऱ्या या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या किनारपट्टी नियमन क्षेत्र (CRR) प्राधिकरणाकडून अखेर अंतिम परवानगी मिळाली आहे.

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रोचा मार्ग मोकळा; केंद्राची मंजुरी, पण 5 हजारांहून अधिक झाडांवर चालणार कुऱ्हाड

Thane Ring Metro: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. खाडी व कांदळवन क्षेत्रावरून जाणाऱ्या या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या किनारपट्टी नियमन क्षेत्र (CRR) प्राधिकरणाकडून अखेर अंतिम परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने पाठवलेल्या शिफारशीची दखल घेत केंद्र सरकारने 12,200 कोटी रुपयांच्या या महत्त्वकांक्षी आराखड्याला मान्यता दिली.

झाडांच्या हानीची भरपाई: तिप्पट वृक्षारोपणाचा आराखडा

प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान प्रवेशमार्ग, स्थानके आणि इतर पायाभूत सुविधांमुळे सुमारे 6.5 हेक्टर क्षेत्रातील तब्बल 5,380 कांदळवनांना फटका बसणार आहे. वसई खाडी आणि लगतच्या परिसरातील पूरस्थिती टाळण्यासाठी कारशेडच्या मूळ आराखड्यात काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत. निसर्गाचे होणारे हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने विशेष योजना आखली असून, बाधित झाडांच्या बदल्यात सुमारे 37,184 नवीन झाडांची पुनर्लागवड केली जाणार आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि भावी प्रवाशांचा अंदाज

एकूण 29.1 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गावर 22 स्थानके उभारली जातील, ज्यामध्ये 20 उड्डाणपूल स्वरूपातील तर 2 भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय, 18 हेक्टर जागेवर मेट्रो डेपो प्रस्तावित आहे. वर्ष 2029 पर्यंत दैनंदिन सुमारे 6.47 लाख नागरिक या सेवेचा वापर करतील असा अंदाज वर्तवण्यात आला असून, 2045 पर्यंत ही प्रवासी संख्या पावणे नऊ लाखांच्या पार पोहोचण्याची शक्यता आहे. हा मार्ग वाघबीळ, मानपाडा, साकेत, ठाणे स्थानक आणि कोळशेत यांसारख्या प्रमुख भागांना जोडणार आहे.

हेही वाचा – Tukaram Munde FDA On BMC : मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये एफडीएची धाड! उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून कारवाई; रात्रीच कॅन्टीनला ठोकलं टाळं

स्थानिकांचे आक्षेप आणि असंतोष

एकीकडे प्रकल्पाला प्रशासकीय गती मिळत असताना, दुसरीकडे ठाणेकरांमधून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यमान मेट्रो 4 आणि 5 च्या मार्गांवरच पुन्हा हा प्रकल्प येत असल्याने प्रत्यक्ष गरज असलेल्या भागांना याचा लाभ मिळणार नाही, असा आरोप केला जात आहे. विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील सुमारे 27 लाख नागरिक या सुविधेपासून वंचित राहणार असल्याने रहिवाशांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number