Mumbai Local RPF-GRP Vacancy: 75 लाख प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे; मुंबई लोकलमध्ये RPF आणि GRP पोलिसांची तब्बल 2559 पदे रिक्त

मुंबई रेल्वे विभागात या दोन्ही दलांमधील तब्बल 2559 पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, आरपीएफमधील दर चौथे पद रिकामे असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे.

Mumbai Local RPF-GRP Vacancy: 75 लाख प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे; मुंबई लोकलमध्ये RPF आणि GRP पोलिसांची तब्बल 2559 पदे रिक्त

Mumbai Local RPF-GRP Vacancy: मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षेच्या दृष्टीने रामभरोसे ठरत आहे. मुंबई लोकलधून दररोज प्रवास करणाऱ्या तब्बल 75 लाख प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) या दोन्ही यंत्रणांना सध्या प्रचंड मनुष्यबळाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई रेल्वे विभागात या दोन्ही दलांमधील तब्बल 2559 पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, आरपीएफमधील दर चौथे पद रिकामे असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे एकूणच रेल्वे सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर पडल्याचे चित्र आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेमधील रिक्त जागांचा धक्कादायक आकडा
मुंबई विभागातील मध्य आणि पश्चिम रेल्वे अंतर्गत आरपीएफ कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर पदे 7042 आहेत, मात्र प्रत्यक्षात केवळ 5226 कर्मचारीच कर्तव्यावर असून 1816 पदे रिक्त आहेत. टक्केवारीचा विचार केल्यास आरपीएफमध्ये 25.8 टक्के पदे रिकामी आहेत.

मध्य रेल्वे: एकूण मंजूर पदे 5148 असून, 3852 कर्मचारी कार्यरत आहेत, तर 1296 पदे रिक्त आहेत.

पश्चिम रेल्वे: एकूण मंजूर पदे 1894 असून, 1374 कर्मचारी कार्यरत आहेत, तर 520 पदे रिक्त आहेत.

रेल्वे पोलिसांना करावी लागतेय 12 तासांपेक्षा जास्त ड्युटी
लोकलमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी आरपीएफसोबतच लोहमार्ग पोलीस (GRP) देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, जीआरपीमध्येही 17.5 टक्के पदे रिक्त आहेत. एकूण मंजूर 4243 पदांपैकी 743 जागा अद्याप भरलेल्या नाहीत. जरी काही जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी नवीन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अजून सुरूच आहे. या गंभीर तुटवड्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांना सलग 12 तासांपेक्षा जास्त वेळ ड्युटी करावी लागत आहे. याचा थेट फटका महिला डब्यांची सुरक्षा, गर्दीच्या वेळची गस्त आणि संशयित घटकांवर पाळत ठेवण्याच्या कामाला बसत आहे.

हेही वाचा – Nana Patole : सरकारच पितळ उघडं पडलं; चेंबूरमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर नाना पटोले सरकारवर बरसले

गुन्हेगारी घटनांमुळे प्रवासी भयभीत; रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी
दरम्यान, नुकत्याच चर्चगेट-बोरिवली आणि चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून दोन प्रवाशांच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या रक्तरंजित घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून रेल्वेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या मनुष्यबळाची तात्पुरती कमतरता भरून काढण्यासाठी होमगार्ड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाची (MSF) मदत घेतली जात आहे. परंतु, कायदेशीर अधिकारांच्या मर्यादांमुळे हे जवान मुख्य दलाला पूर्ण पर्याय ठरू शकत नाहीत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी ही रिक्त पदे तात्काळ भरली जावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number