दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या थेरपी सेंटरचा शुभारंभ

दिव्यांग स्कूल आणि दिव्यांग थेरपी सेंटर याचे भव्य उद्घाटन मारवाडी स्कूल, चर्नी रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या थेरपी सेंटरचा शुभारंभ

मुंबई : "आर के फाउंडेशन" आणि "देवानचंद फाउंडेशन" यांच्या सहकार्याने दिव्यांग स्कूल आणि दिव्यांग थेरपी सेंटर याचे भव्य उद्घाटन मारवाडी स्कूल, चर्नी रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मनु निळे (जय महाराष्ट्र न्यूज डिजिटल कंटेंट), साक्षी दरेकर (भाजपा अनुसूचित जमाती जनरल सेक्रेटरी), वृत्तनिवेदिका जानवी सावंत (जय महाराष्ट्र न्यूज) तसेच राम कदम (अध्यक्ष, आर के फाउंडेशन) आणि कांचन पवार (अध्यक्ष, देवानचंद फाउंडेशन) उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांपैकी डॉ. प्रगती वाजा, मनीषा गायकवाड, जिया सुर्वे, नितीन कोलगे, आतिश थोरात, शशिकांत खरात, राहुल कांबळे आणि संदेश गायकवाड यांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेतला.

१५० दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वागदेकर आणि शशिकांत लिंबारे यांनी केले. हे केंद्र दिव्यांग मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number