Rajpal Yadav : छोटा राजनसारख्या कुख्यात गँगस्टरच्या शेजारच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी

राजपालला तिहारच्या तुरुंग क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे छोटा राजन आणि नीरज बवाना सारखे कुख्यात गुंडही बंदिवान आहेत.<br/>

Rajpal Yadav : छोटा राजनसारख्या कुख्यात गँगस्टरच्या शेजारच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी

Rajpal Yadav: आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवणारा बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात दिवस काढत आहे. 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याला तुरुंगवास झाला आहे. राजपालला तिहारच्या तुरुंग क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे छोटा राजन आणि नीरज बवाना सारखे कुख्यात गुंडही बंदिवान आहेत.

सकाळी 6 ते संध्याकाळी 6; असा आहे तुरुंगातील दिनक्रम
तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल यादवचे आयुष्य सध्या एका सामान्य कैद्यासारखे आहे. नियमांनुसार त्याला सकाळी 6 वाजता बॅरेकमधून बाहेर सोडले जाते, त्यानंतर चहा आणि नाश्ता दिला जातो. दिवसभर इतर कैद्यांसोबत वेळ घालवल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता त्याला जेवण दिले जाते. इतर कैदी राजपालला भेटण्यासाठी उत्सुक असतात, मात्र कडक सुरक्षेमुळे कोणालाही त्याच्या जवळ जाण्याची परवानगी नाही.

हेही वाचा – Film Project Fraud: दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; दोन महिन्यांनंतर होणार तुरुंगातून सुटका

कर्ज आणि चेक बाऊन्सचे प्रकरण
हे संपूर्ण प्रकरण 2010 सालातील आहे. राजपालने 'आता पता लपता' या चित्रपटासाठी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट फ्लॉप झाल्याने आणि वेळेत कर्ज न फेडल्याने व्याजासह ही रक्कम 9 कोटी रुपयांवर पोहोचली. या बदल्यात दिलेले अनेक चेक बाऊन्स झाल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2026 रोजी राजपालने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले.

बॉलिवूडचे दिग्गज मदतीला धावले
संकटाच्या या काळात राजपाल यादवला चित्रपटसृष्टीतून मोठा पाठिंबा मिळत आहे. सोनू सूद, गुरमीत चौधरी आणि तेज प्रताप यादव यांच्यानंतर आता सलमान खान, अजय देवगण आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी आर्थिक मदत देऊ केली आहे, तर काहींनी त्याला नवीन काम देण्याचे आश्वासन दिले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number