Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाने हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना धक्का बसला. बारामती येथील घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुश्रीफ यांना आपले अश्रू अनावर झाले.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाने हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज, 28 जानेवारी 2026 रोजी बारामती जवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. सकाळी 8:40 वाजता त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे घसरले आणि जवळच्या शेतात कोसळून त्याला आग लागली. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक दमदार आणि धडाडीचा नेता अशा प्रकारे जगाचा निरोप घेईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

हसन मुश्रीफ यांचा टाहो
अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना प्रचंड धक्का बसला. बारामती येथील घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुश्रीफ यांना आपले अश्रू अनावर झाले. “अजितदादांच्या रूपाने आम्ही आमचा मोठा आधार गमावला आहे, हे राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे,” असे म्हणत मुश्रीफ ढसाढसा रडले. आपल्या मित्राला आणि राजकीय मार्गदर्शकाला अशा स्थितीत पाहून मुश्रीफ पूर्णपणे खचून गेले होते, त्यांचे हे दृश्य पाहून उपस्थित कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले.

हेही वाचा – Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंब पोरकं; युगेंद्र पवारांचा टाहो, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

प्रशासकीय चौकशी आणि अंत्यसंस्कार
अपघातानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळाचा ताबा घेतला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. या दुःखद प्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली असून, राज्याने एक मोठा नेता गमावला असल्याची भावना व्यक्त केली आहे.

पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या अपघातामुळे पवार कुटुंबावर आणि त्यांच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमदार रोहित पवार यांनाही अश्रू अनावर झाले असून, ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दिल्लीत होते, ते तातडीने विशेष विमानाने बारामतीकडे निघाले आहेत. या घटनेमुळे बारामती शहर आणि परिसरातील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. 1982 सालापासून राजकारणात सक्रिय असलेल्या ‘दादां’नी आपल्या शिस्तीने आणि कामाच्या वेगाने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता.

हेही वाचा – Ajit Pawar Death: अजित पवार यांची सदैव आठवण राहील! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भावनिक श्रद्धांजली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number