Mumbaicha Raja Visrajan 2026: गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच! ‘मुंबईचा राजा’ घेणार अनोख्या पद्धतीने निरोप; गणेशभक्तांचा उत्सुकता शिगेला

सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाची भाविकांना विशेष उत्सुकता असते. दरम्यान मुंबई गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’चा यंदाचा विसर्जन सोहळा वेगळ्या पद्धतीनं करण्याचं ठरवलं आहे. गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’चे यंदा 99 वे वर्ष आहे. शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या प्रसिद्ध ‘मुंबईचा राजा’ची […]

Mumbaicha Raja Visrajan 2026: गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच! ‘मुंबईचा राजा’ घेणार अनोख्या पद्धतीने निरोप; गणेशभक्तांचा उत्सुकता शिगेला
‘मुंबईचा राजा’ गिरगाव चौपाटी विसर्जन

सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाची भाविकांना विशेष उत्सुकता असते. दरम्यान मुंबई गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’चा यंदाचा विसर्जन सोहळा वेगळ्या पद्धतीनं करण्याचं ठरवलं आहे. गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’चे यंदा 99 वे वर्ष आहे.

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या प्रसिद्ध ‘मुंबईचा राजा’ची शेवटची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक लालबाग ते गिरगाव चौपाटी या आपल्या पारंपारिक मार्गाने मार्गक्रमण करेल, मुंबई गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच एक अभिमानास्पद सुवर्णपान जोडले जात आहे.

Pune : 10 हजार कर्मचारी तैनात! सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे ठेवणार लक्ष; बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील ‘ही’ चूक ठरणार भारी

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने, यंदा प्रथमच 22 फुटी भव्य ‘मुंबईच्या राजा’चे विसर्जन गिरगाव चौपाटी येथे अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट खोल समुद्रात करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्रेन आणि बार्जच्या मदतीने थेट खोल समुद्रात विसर्जन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

मुंबईत आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचा हायटेक उपक्रम प्रथमच राबविला जात असल्याने भाविकांमध्ये याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईच्या गणेशोत्सवात असा प्रयोग पहिल्यांदाच होत असून, हा निर्णय ऐतिहासिक व पथदर्शी ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number