Uddhav Thackeray : 31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? पक्ष फोडायला पैसे आहेत मग शेतकऱ्यांना मदत करा; दुष्काळी परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार

31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल पाहून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल केला.

Uddhav Thackeray : 31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? पक्ष फोडायला पैसे आहेत मग शेतकऱ्यांना मदत करा; दुष्काळी परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार
दुष्काळी परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर, धाराशिव, सोलापूर दौरा करत शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली, यावेळी त्यांनी दुष्काळाचा जीआर येत्या दोन दिवसात काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. याचपार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. मागील वर्षी मागील ओल्या दुष्काळावेळी सरकारने ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातील किती पैसे शेतकऱ्यांना मिळाले, तसेच आताही कर्जमाफी जाहीर केली आहे? सरकार केवळ दुष्काळ दौरेच करणार की मदतही जाहीर करणार आहे? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “कालची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराबद्दल होती. आज दुष्काळाबाबत आज बोलणार आहे. नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अशांना महाराष्ट्र तोंड देत आहे. मागच्या वेळेस मी गेलो होतो तेव्हा विचित्र संकट होत. त्यावेळी दौरा केला होता आणि कर्जमुक्तीची मागणी केली होती. गेल्यावर्षी 31 हजार कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलं होत. यापैकी किती मदत शेतकऱ्यांना मिळाली याची आकडेवारी सरकारने द्यावी. हा पावसाळा सुरु होत असताना दुष्काळाचा अंदाज वर्तवला होता मग सरकारने काय उपाय सुचवले होते.”

“आता परतीच्या पावसात निदान शेतकऱ्यांच्या विहरी भरु दे, पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न सुटू दे. दौरे चालले आहेत ते दौरे करा शेतकऱ्यांना धीर द्या. मुख्यमंत्री महोदय म्हटले होते की, 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होतील म्हणून मी त्यांची खिल्ली उडवली होती. आज बातमी आली की दोन तीन दिवसात निर्णय घेऊ. मग कॅबिनेट मिटिंग घेतात कशाला? मंत्री आणि सहकारी आहेत कशाला ते परिस्थिती सांगत नाहीत का? संकट आलंय ते रोखायच कसं? हे सरकार सांगत नाही. माझ्याकडे बातमी आल्या आहेत काही ठिकाणी 10 मिनिटात मुख्यमंत्री निघाले आमचे आमदार भेटीला आले होते त्यांना दोर लावून ठेवलं होत. सरकारने दुष्काळ जाहीर करावा मग अशामध्ये कोणते निकष बघता.”

Rohit Pawar On Devendra Fadanvis : “जे बोलता ते करून दाखवा” दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणीदरम्यान रोहित पवारांनी सरकारला घेरलं

“शेतकऱ्यांना कर्ज माफी खरच झाली आहे का? किती झाली याची आकडेवारी आहे का? अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतुन कितीजणांना लाभ झाला आहे. किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला याची माहिती आम्हाला द्या. माझा शेतकरी पळून जाणारा नाही… कर्ज फेडावं लागेल म्हणून परदेशात जाणारा माझा शेतकरी नाही. जेव्हा शेतकऱ्याच्या दारावर नोटीस लागते तेव्हा त्याची बदनामी होते म्हणून तो आत्महत्या करतो. आमची मागणी आहे की तीन महसूल विभागात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा 3 ठिकाणी कॅबिनेट बैठक घ्यावी. सोबतच विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं. तात्काळ विधिमंडळ अधिवेशन घेतलं पाहिजे.”

“सरकारला सांगितल्यानंतर माझ्या शिवसैनिकांना सांगतोय की ग्रामीण भागात मदत केंद्र सुरु करा, शेतकऱ्यांना मदत होतेय की नाही? पंचनामा होतोय की नाही यावर लक्ष शिवसैनिकानी ठेवावे. आदित्य दोन दिवसात जाणार आहे मी देखील पाहणी दौऱ्यात जाणार आहे. अमित शहा यांनी येऊन बघितलं पाहिजे मदत केली पाहिजे त्यांच्याकडे पक्ष फोडायला पैसे आहेत मग त्यांनी शेतकऱ्याना मदत करावी. पंतप्रधान यांचे परदेश दौरे झाले असतील त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. जी सरकार मदत जाहीर करेल ती मदत 40-45 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या हातात आली पाहिजे. मंत्र्यांना काजू बदामाची सोय केली पण शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चार्याची व्यवस्था करा. ज्या जनावरांना काजू बदाम खायचे आहेत त्यांना ते द्या पण शेतकऱ्यांच्या जनावराला चारा द्या.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number