Rohit Pawar On Devendra Fadanvis : “जे बोलता ते करून दाखवा” दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणीदरम्यान रोहित पवारांनी सरकारला घेरलं

आज छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी बॅरिकेट्स आणि मेटल डिटेक्टर लावण्यात आल्यावरुन आमदार रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

Rohit Pawar On Devendra Fadanvis : “जे बोलता ते करून दाखवा” दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणीदरम्यान रोहित पवारांनी सरकारला घेरलं
रोहित पवारांकडून छत्रपती संभाजीनगरात दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी

राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर, धाराशिव, सोलापूर दौरा करत शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी बॅरिकेट्स आणि मेटल डिटेक्टर लावण्यात आल्यावरुन आमदार रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, “गेली काही दिवस आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतोय, आमच्या अंदाजानुसार 35 हजार कोटींची नुकसान मराठवाड्यात झाले आहे, राज्यात 80 हजार कोटींची नुकसान झाले आहे. सरसकट मदत मिळायला हवी, त्याला निकष नको, अजून गेल्या अतिवृष्टी नुकसान मदत मिळाली नाहीय. जे बोलता ते करून दाखवा असे आमचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री म्हणतात सरसकट नुकसान झाले आहे तर मग सरसकट नुकसान भरपाई द्या. मजुरांना काम नाही त्यांना ही मदत करा आणि मंत्र्यांनी फिरताना मेटल डिटेक्टर कशाला हवे तो शेतात बॉम्ब लावत नाही, सामान्य शेतकऱ्यांना भेटा. स्थानिक नेते सामान्य शेतकऱ्यांना मागे ठेवतात आणि कार्यकर्ते पुढे ठेवतात. 12 लाख शेत कर्यांनी कर्जमाफी साठी अर्ज केला, सरकारने मंजूर केले 8 लाख, त्यातील आता पर्यंत फक्त 4 लाख लोकांना मदत मिळाली आहे. मराठवाड्यात भयावह परिस्थिती आहे, प्यायचे पाणी कसे द्यायचे याचेही संकट आहे, माणसांना पाणी द्या सोबतच जनावरांना ही पाणी द्या, त्यांच्या साठी ही वेगळा टँकर हवाय. ”

पुढे रोहित पवार म्हणाले की, “मराठवाडा विभागात शेतीच 35 हजार रुपये कोटीचा नुकसान झालं आहे… विदर्भात 25 हजार कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचा झाला आहे. खानदेश पश्चिम महाराष्ट्रात 17 हजार कोटीचे नुकसान झाले आहे. सरसकट माफी किंवा मदत सरकारकडून मिळाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना आहे. गेल्यावेळी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीची मदत बहुतांश शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही. मागच्या वेळी शेतकऱ्यांना केवळ अडीचशे रुपये हेक्टरी मदत आलेली आहे संभाजीनगर जिल्ह्यात. जालन्यात 60 रुपये हेक्टरी मदत आलेली आहे. बीडमध्ये 26 रुपये आलेली आहे मग सरकारची घोषणा खड्ड्यात गेली आहे का.”

Amravati Farmer Loan Issue : अमरावतीत कर्जमाफी होऊनही कृषी कर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ; यशोमती ठाकूर यांना संताप अनावर

“मुख्यमंत्र्यांनी सरसकट म्हटलं आहे आता याच्यात अटीतटी टाकू नका थेट सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्यांना मदत करा मजुरांना देखील काम नाही मजुरांना 25 हजार रुपये अनुदान द्या. फिरताना फिरा मात्र शेतकऱ्यांसाठी मेटल डिटेक्टर लावू नका. शेतकऱ्यांना तुम्ही का घाबरत आहे. सामान्य शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटावं. कर्जमुक्तीसाठी 12 लाख शेतकऱ्यांनी मराठवाड्यातून अर्ज केले मात्र गृहीत आठ लाख केलेले आहे. चार लाख लोकांना पैसे मिळालेत मग बाकी उर्वरित आठ लाख शेतकऱ्यांचं तुम्ही काय केलं.”

“पुढील दहा दिवसात पूर्ण 35 हजार कोटीची कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकरी आणि मजुराला जगवायचं असेल तर मन मोकळे पद्धतीने सरसकट मदत द्या. आम्ही शिव शाहू फुले यांच्या विचाराने पुढे चाललो आहोत. आम्ही सर्व समाजाच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. व्यथा मांडण्याचा सामान्य शेतकरी प्रयत्न करत होते मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले गेले नाही. शेतकऱ्यांनी काही वक्तव्य केल्यास मुख्यमंत्री हे आमदार राणा यांच्यावर चिडू नये म्हणून हे प्रयत्न केले गेले असावेत. फडणवीसचा अपमान झाला, एकनाथ शिंदेचा अपमान झाला त्यांच आमदार रस्त्यावर उतरतात. मग छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्यावर हे कुठल्या बिळात जाऊन बसतात. ”

“माध्यमांनी शेतकऱ्यांच्या व्यथा दाखवल्या, कार्यकर्ते बांधावर गेले म्हणून मुख्यमंत्र्यांना फिरावं लागतंय, दखल घ्यावी लागली. तेरा वेळेस फडणवीस यांनी व्यक्त केला आहे की मराठवाड्याला पाणी आणू.. देवेंद्र फडणवीस यांची ही खासियत आहे उद्या निवडणूक आल्या तर ते असे म्हणतील की तुम्हाला चंद्रावर नेऊ. तेरा वेळेस लोक फसले आता इथून पुढे लोक फसणार नाहीत. काल मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं शेतमजूर आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आता हे वाक्य आम्ही सोडणार नाहीत. आता मदत सरसकट झाली पाहिजे असं आमचं मत आहे. सरकारकडून प्रयत्नशील सकारात्मक आहोत हे शब्द खूप डेंजर आहेत,सत्ताधाऱ्यांनी हे शब्द वापरू नये. आम्ही देणारच असं शब्द वापरावे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number