पुणे : पुण्यात गणेश विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून, विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अचुतित प्रकार घडू नये, त्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केलेली आहे. शहरातील प्रमुख विसर्जन मार्गांवर तब्बल 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यासोबतच संपूर्ण मिरवणुकीवर दोन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर राहणार आहे.
गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसांची जय्यत तयारी
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत कृत्रिम बु्द्धिमत्ता म्हणजे एआय या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. याच माध्यमातून मिरवणुकीतील सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. विशेषतहा या काळात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन,संशयास्पद हालचाली तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींवर पोलिसांची नजर राहणार आहे.
हेही वाचा-CRIME : गणपती विसर्जनाला गालबोट; मंडळ अध्यक्षाचा मृत्यू, दोन दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळं वळण
याच दरम्यान, मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेचाही वापर करणाऱ्यांवर शिवाच निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, त्यामुळेच गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत असलेल्या सर्व नियमांचे पालक करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
प्रमुख मार्गांवर कडक सुरक्षा
उद्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळून सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल.
लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता तसेत कुमठेकर रस्ता यांसह प्रमुख विसर्जन मार्गांवर पोलिसांची पथके तैनात राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त अतिरिक्त मनुष्यबळही तैनात राहणार असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडावा,यासाठी पोलिस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.