मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये शनिवार ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे. दुरुस्तीचे काम रविवार ०१ डिसेंबर २०२४ ते सोमवार ०२ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुरू राहणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे तसेच भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे रविवार ०१ डिसेंबर २०२४ ते गुरुवार ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मुंबईला सात धरणांतून दररोज एकूण 3.4 अब्ज लिटर पाण्याचे वितरण केले. या पाणीपुरवठ्यात रविवार ०१ डिसेंबर २०२४ ते गुरुवार ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत दहा टक्के कपात करण्यात येणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणे / तलाव