Mumbai Metro: मुंबई-ठाणे मेट्रोच्या विस्ताराला चालना! राज्य सरकारकडून MMRDA ला 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज

राज्य सरकारने एमएमआरडीएला एकूण 500 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. या निधीमुळे प्रलंबित कामांना वेग मिळेल.

Mumbai Metro: मुंबई-ठाणे मेट्रोच्या विस्ताराला चालना! राज्य सरकारकडून MMRDA ला 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज

Mumbai Metro: मुंबई आणि ठाणे शहरांना आधुनिक वाहतूक सुविधांनी जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पांना आता नवी चालना मिळणार आहे. राज्य सरकारने एमएमआरडीएला एकूण 500 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. या निधीमुळे प्रलंबित कामांना वेग मिळेल. तसेच नियोजित मार्गिकांचा विकास अधिक जलदगतीने होईल. दरम्यान, हे कर्ज दहिसर, मीरा रोड, ठाणे, कल्याण आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवरील नऊ प्रमुख मेट्रो प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या करांपोटी 50 टक्के आणि स्थानिक कर तसेच जमीन खर्चासाठी 100 टक्के रक्कम या माध्यमातून भरून काढली जाणार आहे. अर्बन डेव्हलपमेंट विभागाकडून याबाबतचा औपचारिक आदेश जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा – Hoardings Ban : मोठी बातमी! फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवरील जाहिरातींवर BMC कडून बंदी

कोणत्या मेट्रो प्रकल्पांना किती निधी?

कर्जातून विविध मार्गिकांना स्वतंत्र निधी वाटप करण्यात आले असून त्यामध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे:

मेट्रो लाईन 5 (ठाणे–भिवंडी–मुंबई)

या महत्त्वाच्या मार्गिकेसाठी 52 कोटी 38 लाख 60 हजार रुपये मंजूर. ठाणे व भिवंडी परिसरातील रहदारीवरील ताण कमी करण्यासाठी ही लाईन महत्त्वाची मानली जाते.

मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर–जोगेश्वरी–विखरोळी)
या पूर्व–पश्चिम जोडणीला 32 कोटी 95 लाख 20 हजार रुपये.

मेट्रो लाईन 2A (दहिसर पूर्व–DN नगर)
एकूण 28 कोटी 89 लाख 70 हजार रुपयांची तरतूद.

मेट्रो लाईन 2B (DN नगर–मांडले)
या विस्तारित मार्गासाठी 112 कोटी 80 लाख रुपये देण्यात आले.

मेट्रो लाईन 4 आणि 4A (वडाळा–कासारवडवली–गायमुख)
दोनही मार्गिकांसाठी एकत्रित 98 कोटी 72 लाख 80 हजार रुपये.

मेट्रो लाईन 7 (अंधेरी पूर्व–दहिसर पूर्व)
या प्रकल्पाला 49 कोटी 63 लाख 20 हजार रुपयांची मदत.

मेट्रो लाईन 9 आणि 7A (दहिसर–मीरा रोड / अंधेरी–CSMIA)
दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून 66 कोटी 71 लाख 40 हजार रुपये वितरित झाले.

गायमुख–शिवाजी चौक (मीरा रोड)
या मार्गासाठी 86 कोटी 14 लाख 80 हजार रुपये मंजूर.

मेट्रो लाईन 12 (कल्याण–तळोजा)
या महत्त्वाच्या विस्तारासाठी 1 कोटी 8 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर.  

हेही वाचा – Uddhav Thackeray : 'मुंबईतील प्रदूषण वाढण्यामागे इथला भ्रष्टाचार', उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; विकास प्रकल्पांवरूनही निशाणा

निधी वितरणासंदर्भातील शासननिर्णय बुधवारी जारी करण्यात आला असून, या आर्थिक मदतीमुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील मेट्रो प्रकल्पांची गती लक्षणीय वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचे चित्र बदलणाऱ्या या मेट्रो नेटवर्कला मिळालेली ही मदत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number