BMC officer Transfer Cancelled: भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुंबई महापालिका बॅकफूटवर; 122 अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द

ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आलेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांमधील अनियमिततेवर शिक्कामोर्तब करत, पालिकेने आता हे बदली आदेश पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.<br/>

BMC officer Transfer Cancelled: भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुंबई महापालिका बॅकफूटवर; 122 अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द

BMC officer Transfer Cancelled: मुंबई महानगरपालिकेतील 'ट्रान्सफर मार्केट' आणि बदल्यांमधील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण प्रशासनाला चांगलेच अंगलट आले आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आलेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांमधील अनियमिततेवर शिक्कामोर्तब करत, पालिकेने आता हे बदली आदेश पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमका वाद काय होता?
ऑक्टोबर 2025 मध्ये मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर अभियंत्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत 122 अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण आणि गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजप नेते अमित साटम यांनी या प्रकरणातील अनियमिततेवर बोट ठेवत प्रशासनाला धारेवर धरले होते. या राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती.

प्रशासनाचा 'यू-टर्न' आणि चौकशीचा फेरा
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महापौर रितू तावडे यांनी आक्रमक पवित्रा घेत सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे या प्रकरणाची सूत्रे सोपवण्यात आली. तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी यांनी सुरुवातीला या बदल्यांना स्थगिती दिली होती. मात्र, आता प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत हे सर्व बदली आदेश पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, हा एक मोठा 'यू-टर्न' मानला जात आहे.

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आणि पुढील दिशा
इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे तब्बल 122 बदली आदेश रद्द करावे लागल्यामुळे पालिकेतील अंतर्गत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही प्रशासनाने दिलेली एक प्रकारे अनियमिततेची कबुलीच मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेतील आगामी बदल्या या एखाद्या स्वतंत्र समितीमार्फत राबवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – Mumbai Megablock: प्रवाशांसाठी अलर्ट! रविवारी पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक; हार्बर मार्गावर सेवा विस्कळीत

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
या निर्णयामुळे पालिकेतील कथित 'ट्रान्सफर मार्केट'ची चर्चा आता पुन्हा एकदा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासन आता नेमकी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number