Indian Engineer Died Iran Attack: इराणच्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील इंजिनिअरचा मृत्यू; 15 भारतीयांना वाचवण्यात यश

इराणने अमेरिकन तेलवाहू टँकरवर केलेल्या भीषण अंडरवॉटर ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवली भागातील मरीन इंजिनिअर देवनंदन प्रसाद सिंह (50) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Indian Engineer Died Iran Attack: इराणच्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील इंजिनिअरचा मृत्यू; 15 भारतीयांना वाचवण्यात यश

Indian Engineer Died Iran Attack: आखाती देशांमध्ये पेटलेल्या अमेरिका आणि इराण युद्धाच्या ज्वाळा आता थेट मुंबईपर्यंत पोहोचल्या आहेत. इराणने अमेरिकन तेलवाहू टँकरवर केलेल्या भीषण अंडरवॉटर ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवली भागातील मरीन इंजिनिअर देवनंदन प्रसाद सिंह (50) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कांदिवली परिसरात शोककळा पसरली असून, दोन देशांमधील संघर्षाची मोठी किंमत एका निष्पाप भारतीय कुटुंबाला मोजावी लागली आहे.

नेमकी घटना काय?
इराकच्या किनारपट्टीजवळून जात असलेल्या 'सेफसी विष्णू' या अमेरिकन मालकीच्या कच्च्या तेलाच्या टँकरला इराणच्या 'इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) लक्ष्य केले. इराणने समन्वित पद्धतीने 'अंडरवॉटर ड्रोन'द्वारे या जहाजावर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर जहाजावर मोठा स्फोट होऊन आग लागली. जहाजावर 'ॲडिशनल चीफ इंजिनिअर' म्हणून कार्यरत असलेले देवनंदन सिंह या आगीत गंभीर भाजले गेले होते. त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुदैवाने, या जहाजावरील इतर 15 भारतीय खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

कांदिवलीवर दुहेरी आघात
देवनंदन सिंह हे मूळचे बिहारचे असून 2019 पासून ते कांदिवली (पूर्व) येथे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या सिंह यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच ओमानमध्ये झालेल्या अशाच एका हल्ल्यात कांदिवलीतीलच दीक्षित सोलंकी या 25 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांत कांदिवलीने आपला दुसरा सुपुत्र या युद्धात गमावल्याने परिसरात संतापाची आणि दुःखाची लाट पसरली आहे.

हेही वाचा – Nana Patole : 'केंद्र सरकार अमेरिका-इस्रायलला शरण गेले'; नाना पटोलेंचा घणाघात, गॅस टंचाईमुळे मुंबईतील 80 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद

युद्धाची भीषण पार्श्वभूमी
गेल्या 14 दिवसांपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण असा तीव्र संघर्ष सुरू आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक रोखण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला खिळ घालण्यासाठी इराणकडून सातत्याने अमेरिकन मालकीच्या जहाजांना लक्ष्य केले जात असून, या जागतिक राजकारणाच्या संघर्षात भारतीय नागरिक बळी पडत असल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number