Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास होणार स्मार्ट; पश्चिम रेल्वेवर 325 हायटेक ATVM मशीन दाखल, लांब रांगांतून मिळणार सुटका

प्रवाशांना अवघ्या काही सेकंदात तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी स्थानकांवर 325 नवीन 'ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स' (ATVM) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.<br/>

Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास होणार स्मार्ट; पश्चिम रेल्वेवर 325 हायटेक ATVM मशीन दाखल, लांब रांगांतून मिळणार सुटका

Mumbai Local: लोकलच्या तिकीट खिडकीवरील लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे. प्रवाशांना अवघ्या काही सेकंदात तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी स्थानकांवर 325 नवीन 'ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स' (ATVM) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमका काय होणार बदल?
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकात नुकतेच ‘मेरा टिकट मेरी शान’ या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी या नव्या सुविधेबाबत माहिती दिली.

जुन्या मशीन बदलणार
सध्या 501 मशीन्स कार्यरत आहेत, त्यापैकी आयुर्मान संपलेल्या 110  मशीन्स हटवून त्याजागी नव्या हायटेक मशीन्स लावल्या जातील. उर्वरित नव्या मशीन्स गर्दीच्या ठिकाणांवर आणि पादचारी पुलांवर (FOB) बसवण्यात येतील. नवीन मशीन्समध्ये UPI आणि इतर ऑनलाइन पेमेंट पर्याय अधिक जलद चालतील, ज्यामुळे सुट्या पैशांची कटकट उरणार नाही.

हेही वाचा – Mumbai Mhada Lottery: 'प्रथम येईल त्यास प्राधान्य'; मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाची 'ही' बंपर लॉटरी पाहिलीत का?

प्रवाशांच्या तक्रारींची दखल
अनेकदा स्थानकांवरील जुन्या मशीन्स बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तांत्रिक बिघाडामुळे होणारा हा त्रास लक्षात घेऊन नव्या पिढीच्या जलद मशिन्स कार्यान्वित केल्या जात आहेत. यासोबतच प्रवाशांना 'रेल वन' (Rail One) या मोबाईल ॲपचा वापर करण्याचे आवाहनही रेल्वेने केले आहे, जेणेकरून रांगेत उभे न राहता तिकीट काढता येईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number