FIFA World Cup 2026: 48 देशांच्या सहभागासह ‘या’ तारखेपासून रंगणार ऐतिहासिक फिफा विश्वचषक; पाहा संपूर्ण वेळापत्रक

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या या महासोहळ्यात एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत.

FIFA World Cup 2026: 48 देशांच्या सहभागासह ‘या’  तारखेपासून रंगणार ऐतिहासिक फिफा विश्वचषक; पाहा संपूर्ण वेळापत्रक

FIFA World Cup 2026: जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचा थरार आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'फिफा विश्वचषक 2026' (FIFA World Cup 2026) चा महासंग्राम येत्या 11 जूनपासून सुरू होणार आहे. फुटबॉलच्या इतिहासात ही स्पर्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण आजवर या स्पर्धेत 32 संघ खेळताना दिसत होते, मात्र यंदा पहिल्यांदाच तब्बल 48 देश विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या या महासोहळ्यात एकूण 104 सामने खेळवले जाणार असून, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि प्रदीर्घ विश्वचषक ठरेल.

कसा असेल बाद फेरीपर्यंतचा रंजक प्रवास? जाणून घ्या नवीन फॉरमॅट
स्पर्धकांचे प्रमाण वाढल्यामुळे फिफाने यंदा खेळाच्या स्वरूपात मोठा बदल केला आहे. सहभागी 48 संघांची विभागणी 12 गटांमध्ये करण्यात आली असून, प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे. गट फेरीत प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्याची संधी मिळेल. या साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ थेट पुढच्या फेरीत जातील. तसेच तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या सर्व संघांपैकी सर्वोत्तम 8 संघांनाही बाद फेरीत (Knockout) प्रवेश दिला जाईल. यानंतर 'राऊंड ऑफ 32' पासुन बाद फेरीचे थरारक सामने सुरू होतील, ज्यातून पुढे 'राऊंड ऑफ 16', उपांत्यपूर्व (Quarter-finals), उपांत्य (Semi-finals) आणि अखेर अंतिम लढत (Final) रंगेल.

फिफा विश्वचषक 2026: 12 गटांची संपूर्ण रचना (A ते L)
या ऐतिहासिक विश्वचषकासाठी फुटबॉल शौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या सर्व 12 गटांची रचना खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:

गट A: मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, झेक प्रजासत्ताक

गट B: कॅनडा, बोस्निया आणि हर्झगोव्हिना, कतार, स्वित्झर्लंड

गट C: ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड

गट D: अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, तुर्की

गट E: जर्मनी, कुरासाओ, आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर

गट F: नेदरलँड्स, जपान, स्वीडन, ट्युनिशिया

गट G: बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड

गट H: स्पेन, केप वर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे

गट I: फ्रान्स, सेनेगल, इराक, नॉर्वे

गट J: अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन

गट K: पोर्तुगाल, डीआर काँगो, उझबेकिस्तान, कोलंबिया

गट L: इंग्लंड, क्रोएशिया, घाना, पनामा

हेही वाचा – India's T20I captain : भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व करणार श्रेयस अय्यर; सूर्यकुमार यादवच्या जागी कर्णधारपदी श्रेयसची नियुक्ती

कित्येक दशकांनंतर दिग्गज संघांचे दणक्यात पुनरागमन
यंदाच्या विश्वचषकाचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे अनेक देशांनी प्रदीर्घ कालावधीनंतर या मुख्य स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. आशियाई देश असलेला इराक तब्बल 40 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या प्रतिष्ठेच्या मंचावर खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे, युरोपमधील ताकदवान संघ स्कॉटलंड देखील तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत दिमाखात पुनरागमन करत आहे. नव्या देशांचा सहभाग आणि दिग्गज संघांचे पुनरागमन यांमुळे यंदाचा विश्वचषक अधिक चुरशीचा आणि फुटबॉल जगतात नवा इतिहास रचणारा ठरेल यात शंका नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number