Lift Collapse: पनवेल स्थानकावर थरार! रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड; 4 प्रवाशांसह लिफ्ट कोसळली , 10 मिनिटे…

या अपघातात लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकले होते, ज्यांची प्रशासनाने तातडीने सुटका केली असली तरी या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.<br/>

Lift Collapse: पनवेल स्थानकावर थरार! रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड;  4 प्रवाशांसह लिफ्ट कोसळली , 10 मिनिटे…

Lift Collapse: पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आज सकाळी प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. गर्दीच्या वेळी प्रवाशांनी भरलेली लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या अपघातात लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकले होते, ज्यांची प्रशासनाने तातडीने सुटका केली असली तरी या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळची गर्दी आणि 10 मिनिटांचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार असल्याने स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ होती. लिफ्ट वरून खाली येत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि ती मध्येच कोसळली. लिफ्ट बंद पडताच आत असलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर राबवलेल्या बचावकार्यामुळे अवघ्या 10 मिनिटांत लिफ्टचे दार उघडून अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

देखभालीकडे दुर्लक्ष की तांत्रिक बिघाड?
मुंबई आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकांवरील लिफ्टच्या सुरक्षेचा मुद्दा नुकताच अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गाजला होता. असे असूनही पनवेलसारख्या गजबजलेल्या स्थानकावर ही दुर्घटना घडल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. देखभालीसाठी कंत्राट दिलेल्या यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.

गर्दीच्या तणावात प्रवाशांचे हाल
पनवेल स्थानक हे लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल आणि मेमू ट्रेनचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे सकाळी 9 च्या सुमारास सुटणारी एसी लोकल अनेकदा उशिराने धावत असल्याने संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. नवीन सुरू झालेल्या 'अमृत भारत' ट्रेनमुळे सोमवारी स्थानकावर प्रवाशांचा महासागर उसळतो. गाड्यांच्या विलंबाने निर्माण होणारी चेंगराचेंगरीची स्थिती आणि त्यात अशा तांत्रिक दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे.

हेही वाचा – Titwala Drug Case: टिटवाळ्यातून 5 कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! 35 वर्षीय ‘ड्रग्ज क्वीन'ला बेड्या, साकीनाका कनेक्शनने लावला छडा

चौकशीचे आदेश
रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून लिफ्ट नेमकी कशामुळे कोसळली, याचा तपास सुरू केला आहे. तांत्रिक बिघाड की देखभालीतील त्रुटी, हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानकांवरील सर्व लिफ्टची नियमित सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number