Mumbai Population: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या लोकसंख्येच्या रचनेत (Demography) वेगाने बदल होत असल्याचे समोर आले आहे. 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' (TISS) ने सादर केलेल्या एका विशेष अहवालात मुंबईतील वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि बांगलादेशी तसेच रोहिंग्या घुसखोरांमुळे शहराच्या सामाजिक-आर्थिक रचनेवर होणाऱ्या परिणामांबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
घुसखोरी आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम
TISS च्या अहवालात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार, हे घुसखोर मुंबईत अनधिकृतपणे वास्तव्य करत असून येथील संसाधनांवर ताण निर्माण करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे घुसखोर मुंबईत कमावलेल्या पैशांचा मोठा हिस्सा दरमहा हुंडी किंवा अन्य मार्गांनी बांगलादेशला पाठवत असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
टीआयएसएसच्या अहवालानुसार, 1961 मध्ये मुंबईत मुस्लिम लोकसंख्या फक्त 8 टक्के होती, जी 2011 मध्ये वाढून 21 टक्के झाली. अहवालानुसार, जर हीच गती कायम राहिली तर 2051 पर्यंत मुंबईतील मुस्लिम लोकसंख्या 30 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. शिवाय, अहवालात असेही म्हटले आहे की मुंबईत पैसे कमवणारे बांगलादेशी घुसखोर त्याचा मोठा भाग बांगलादेशात पाठवत आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या टीआयएसएसच्या पूर्वीच्या अंतरिम अभ्यास अहवालात असे म्हटले आहे की, मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायांची वाढती संख्या शहराच्या सामाजिक-अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे. त्यात असे म्हटले आहे की बांगलादेश आणि म्यानमारमधून बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या (बहुतेक मुस्लिम) मुंबईत वाढत आहे. काही राजकीय पक्ष त्यांचा वापर मतपेढीच्या राजकारणासाठी करत आहेत.
हेही वाचा – Sanjay Raut: ठाकरे बंधू बाजूला, युतीचा शुभमुहूर्त; राऊत काय म्हणाले एकदा वाचाच
सामाजिक-आर्थिक सुरक्षेला धोका
नोव्हेंबर 2024 मधील अंतरिम अभ्यास अहवालाचा संदर्भ देत टीआयएसएसने म्हटले आहे की, बांगलादेश आणि म्यानमारमधून आलेल्या बेकायदेशीर नागरिकांमुळे मुंबईतील गुन्हेगारी आणि आर्थिक समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. शहराचा नकाशा बदलण्याच्या या प्रक्रियेमुळे भविष्यात मोठे नागरी प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.